Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

हैदराबादमध्ये रामनवमीची शोभायात्रा काढण्यास मज्जाव केला जातोय. कारण त्यामुळे काँग्रेसची वोट बँक नाराज होऊ नये. केंद्रात सत्ता आल्यानंतर काँग्रेस वारशाने मिळालेल्या मालमत्तेवर ५५ टक्के कर लावणार आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये काँग्रेसला पुन्हा पराभूत करा, असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं.
Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

PM Narendra Modi Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा मुस्लिम आरक्षणावरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला. धर्माच्या आधारावर मुस्लिमांना ओबीसीमधून किंवा एससी, एसटीमधून आरक्षण देऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

तेलंगणा येथील जहीराबाद येथे आयोजित जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. ते म्हणाले की, वोट बँकेसाठी काँग्रेस संविधानाचा अवमान करत आहे. परंतु मी त्यांना एक सांगतो, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी धर्माच्या आधारावर मुस्लिमांना इतरांचं आरक्षण मिळू देणार नाही.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला
Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

पंतप्रधान मोदींनी यापूर्वीदेखील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारांवर गंभीर आरोप केले होते. कर्नाटकमध्ये मुस्लिमांचा समावेश ओबीसी प्रवर्गात केल्याने पंतप्रधान प्रत्येक सभेत काँग्रेसचा समाचार घेत आहेत.

पंतप्रधान पुढे म्हणाले, एक वेळ होती जेव्हा जगभरातील देश विकासाच्या मार्गावर पुढे जात होते, परंतु काँग्रेसच्या काळात भारत विकासाच्या बाबतीत मागे होता. एनडीएने मोठ्या कठीण प्रसंगातून देशाला बाहेर काढलं. परंतु काँग्रेस पुन्हा देशाला जुन्या वाईट दिवसांकडे घेऊन जाऊ इच्छित आहे.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला
Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

मोदी पुढे म्हणाले, हैदराबादमध्ये रामनवमीची शोभायात्रा काढण्यास मज्जाव केला जातोय. कारण त्यामुळे काँग्रेसची वोट बँक नाराज होऊ नये. केंद्रात सत्ता आल्यानंतर काँग्रेस वारशाने मिळालेल्या मालमत्तेवर ५५ टक्के कर लावणार आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये काँग्रेसला पुन्हा पराभूत करा, असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com