अर्थविश्व

कलकत्ता विद्यापीठ, ‘आयसर’ला संयुक्त निधी

पीटीआय

कोलकता - कोलकता विद्यापीठ, आयसर पुणे आणि ग्लासगो विद्यापीठ या अग्रगण्य शैक्षणिक संस्थांना आता आंतरराष्ट्रीय कर्जपुरवठा योजनेच्या माध्यमातून १.४ कोटी रुपयांचा संयुक्त निधी मिळणार आहे. या तिन्ही संस्थांमधील सहकार्य आणि समन्वय वाढविण्यासाठी हा निधी दिला जाणार आहे. कर्मचारी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची दोन वर्षांसाठी आदानप्रदान करण्यासाठी हा निधी दिला जाणार आहे.

‘इरॅस्मस प्लस’ या आंतरराष्ट्रीय कर्जपुरवठा योजनेच्या माध्यमातून संशोधन विकासातील द्विपक्षीय सहकार्याला बळकटी दिली जाणार असून, दोन भारतीय संस्थांचे ग्लासगो विद्यापीठाशी असणारे शैक्षणिक बंधदेखील यामुळे मजबूत होतील, असे ग्लासगो विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. अँतोन मस्कातेली यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. ‘इरॅस्मस प्लस’ या प्रोग्रॅमच्या माध्यमातून युरोपियन आणि बिगर युरोपीय देशांमधील शैक्षणिक बंध अधिक बळकट करण्यासाठी आर्थिक निधी दिला जातो. प्रशिक्षण, क्रीडा या क्षेत्रांनाही याद्वारे प्रोत्साहन दिले जाते.याबाबत बोलताना ‘आयसर पुणे’ येथील आंतरराष्ट्रीय संबंध कार्यालयाचे प्रमुख प्रो. नरेश शर्मा म्हणाले, की ‘‘ग्लासगो विद्यापीठाला आमच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि महत्त्व पटले असून, त्यामुळेच त्यांनी आमच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: राज्य सहकारी बँकेकडून विठ्ठल कारखान्याचा साखर साठा ताब्यात घेण्याची नोटीस प्रसिद्ध

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT