हरिद्वार - ‘ट्रस्ट रिसर्च ॲडव्हायजरी’कडून आकर्षक व विश्‍वासू ब्रॅंडचे प्रमाणपत्र स्वीकारताना पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आचार्य बालकृष्ण.
हरिद्वार - ‘ट्रस्ट रिसर्च ॲडव्हायजरी’कडून आकर्षक व विश्‍वासू ब्रॅंडचे प्रमाणपत्र स्वीकारताना पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आचार्य बालकृष्ण.  
अर्थविश्व

पतंजली एक विश्‍वासू पर्याय - आचार्य बालकृष्ण

सकाळवृत्तसेवा

हरिद्वार - देशात विदेशी कंपन्यांच्या गर्दीत पतंजली एक विश्‍वासू पर्याय म्हणून पुढे येत असल्याचे पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले. देशातील ब्रॅंड मूल्यांकन करणारी संस्था ‘ट्रस्ट रिसर्च ॲडव्हायजरी’ने ११ हजार कंपन्यांमधून पतंजलीला एफएमजीसी वर्गात ‘एफएमजीसी भारतातील विश्‍वासार्ह ब्रॅंड-२०१७’ घोषित केले. याचसोबत ‘एफएमजीसी भारतातील आकर्षक ब्रॅंड-२०१७’ म्हणूनही पतंजलीची निवड करण्यात आली. या वेळी आचार्य बालकृष्ण यांनी आपले मत व्यक्त केले.

बालकृष्ण म्हणाले, पतंजलीच्या माध्यमातून देशभरात स्वदेशीचे आंदोलन सुरू करण्यात आले. त्यामुळे परकी कंपन्यांना धक्का बसला आहे. पतंजली शंभर टक्के स्वदेशी ब्रॅंड आहे. शुद्धता, ग्राहकांचा विश्‍वास तसेच राष्ट्रसेवेप्रती समर्पणाची भावना ही पतंजलीची वैशिष्ट्ये असल्याचे बालकृष्ण म्हणाले.

देशाभरातील स्वयंपाकगृहात पतंजलीची उत्पादने पोचली असल्याचेही त्यांनी सांगितले.  ‘एफएमजीसी भारतातील विश्‍वासार्ह ब्रॅंड-२०१७’ व ‘एफएमजीसी भारतातील आकर्षक ब्रॅंड-२०१७’ हा प्रत्येक भारतीय नागरिकांचा सन्मान असून, स्वदेशी आंदोलनाचे हे फळ आहे, असेही बालकृष्ण म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT