अर्थविश्व

बिग बास्केट 2.28 अब्ज डॉलरच्या बाजारमूल्यासह युनिकॉर्न क्लबमध्ये...

वृत्तसंस्था

बंगळूरू: बिग बास्केट ही किराणा माल वितरणातील कंपनी भारतातील युनिकॉर्न क्लबमध्ये दाखल झाली आहे. बिग बास्केटने 1,000 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीच्या मूल्यांकनात 140 टक्क्यांची वाढ झाली आहे. अलिबाबा ही चीनची आघाडीची कंपनी बिग बास्केटमधील मुख्य गुंतवणूकदार आहे. नव्याने झालेल्या भांडवल उभारणीमध्ये अलिबाबानेच पुढाकार घेतला होता. 

त्याशिवाय दक्षिण कोरियाची मिराए अॅसेट आणि इंग्लंडमधील सीडीसी हा वित्तीय समूह यांनीसुद्धा बिग बास्केटमध्ये गुंतवणूक केली आहे. मिराए अॅसेटने बिग बास्केटमध्ये 6 कोटी डॉलरचे भांडवल गुंतवले आहे. तर चीनच्या अलिबाबाने 5 कोटी डॉलर आणि सीडीसी समूहाने 4 कोटी डॉलरचे भांडवल गुंतवले आहे. मागील वर्षी बिग बास्केटने 30 कोटी डॉलरचे भांडवल उभारले होते. कंपनीमध्ये इतरही काही आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आहेत. 

ज्या स्टार्ट अप कंपनीचे बाजारमूल्य 1 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडते त्यांना युनिकॉर्न कंपनी संबोधले जाते. बिग बास्केट ही बंगळूरूस्थित स्टार्ट अप कंपनी आहे. डिसेंबर 2011 मध्ये हरी मेनन, व्ही एस सुधाकर, विपूल पारेख, अभिनय चौधरी आणि व्ही एस रमेश यांनी बिग बास्केटची स्थापना केली होती. बिग बास्केट ही भारतातील सर्वात मोठी किराणा मालाचे वितरण करणारी कंपनी आहे. देशातील 32 शहरांमध्ये कंपनीचा व्यवसाय आहे. कंपनीचा वार्षिक महसूल 350-400 कोटी रुपये आहे. आगामी काळात व्यवसाय 3,500 कोटी रुपयांपर्यत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. 

मागील आठवडाभरात युनिकॉर्न गटात सहभागी होणारी बिग बास्केट ही दुसरी कंपनी ठरली आहे. डिल्हीवरी प्रा. लि. ही कंपनी याआधी युनिकॉर्न गटात सामील झाली होती. डिल्हीवरी प्रा. लि. ने 41.3 कोटी डॉलरचे भांडवल उभारत युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश केला होता. जपानी सॉफ्ट बॅंकेने देखील या कंपनीत गुंतवणूक केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT