MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

MI vs KKR
Mumbai Indian Vs Kolkata Knight Riders Live IPL 2024esakal

सूर्या एकटाच लढतोय

सूर्यकुमार यादव मुंबईकडून एकटाच लढतोय. मुंबईची अवस्था 14 षटकात 6 बाद 110 धावा अशी झाली आहे. सूर्यकुमार यादवनं 30 चेंडूत अर्धशतक ठोकत वर्ल्डकपच्या दृष्टीने तयारी करून घेतली.

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

केकेआरचे 170 धावांचे आव्हान पार करताना मुंबईची अवस्था बिकट झाली. केकेआरने मुंबईची अवस्था 9 षटकात 4 बाद 61 धावा अशी केली. सध्या क्रिजवर सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा खेळत आहेत.

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

व्यंकटेश अय्यरने 70 धावांची खेळी केली तर मनिष पांडेने 42 धावा केल्या. याच्या जोरावर केकेआरने 20 षटकात सर्वाबाद 169 धावा केल्या.

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

पहिल्या सहा षटकातच निम्मा संघ गारद झाल्यानंतर केकेआरचा डाव व्यंकटेश अय्यर आणि मनिष पांडेने सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचून संघाला 15 षटकात 129 धावांपर्यंत पोहचवलं. अय्यरनं 36 चेंडूत 50 धावा केल्या.

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये दमदार गोलंदाजी करत केकेआरच्या कसलेल्या फलंदीजीला भगदाड पाडलं. मुंबईने केकेआरची अवस्था 6.1 षटकात 5 बाद 57 धावा अशी केली. नुआन तुषाराने 3 विकेट्स घेतल्या. तर हार्दिकने आणि पियुष चावलाने 1 विकेट घेतली.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली 

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Kolkata Knight Riders Defeat Mumbai Indians In Wankhede After 12Years : तब्बल 12 वर्षांनी केकेआरने मुंबईला वानखेडेवर दिली मात

कोलकाता नाईट रायडर्सने ठेवेलेल्या 170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला सर्वबाद 145 धावांपर्यंतच मजल मारता आली. केकेआरने सामना 24 धावांनी जिंकत आपल्या प्ले ऑफच्या आशेला अजून बळ दिलं. विशेष म्हणजे केकेआरने तब्बल 12 वर्षानंतर मुंबई इंडियन्सला वानखेडेवर मात दिली आहे.

मुंबईकडून सूर्यकुमार यादवनं 35 चेंडूत 56 धावा करत झुंज दिली खरी मात्र केकेआरकडून मिचेल स्टार्कने 4 विकेट्स घेत मुंबईचे कंबरडे मोडले. वरूण चक्रवर्ती आणि सुनिल नारायण यांनी दमदार गोलंदाजी करत प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. रसेलने स्लॉग ओव्हरमध्ये चांगला मारा करत 2 विकेट्स घेतल्या.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कर कोलकाता नाईट रायडर्सचा डाव 169 धावात संपुष्टात आणला. जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषाराने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक 70 धावा केल्या तर मनिष पांडेने 42 धावा केल्या.

तुषाराने केकेआरला पॉवर प्लेमध्ये धक्के देत त्यांची अवस्था 5 बाद 57 धावा अशी केली होती. त्यानंतर अय्यर आणि मनिष पांडेने सहाव्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी रचली. यामुळे केकेआर 140 धावांच्या जवळ पोहची शकली. यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये अय्यरने फटकेबाजी केली. मात्र दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत गेल्या. बुमराहने 18 व्या षटकात 2 तर 20 व्या षटकात एक विकेट घेत केकेआरचा डाव संपवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com