अर्थविश्व

मोबाईल वापरकर्ते ९५.३८ कोटींवर

पीटीआय

नवी दिल्ली - भारतीय दूरसंचार कंपनी संघटनेने (सीओएआय) नुकताच देशभरातील दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या ग्राहकांच्या संख्येचा अहवाल सादर केला आहे. ही आकडेवारी ऑक्‍टोबर २०१७ महिन्यातील असल्याचे ‘सीओएआय’ने जाहीर केले आहे. ‘सीओएआय’ने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील खासगी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांची एकूण ९५.३८ कोटी वापरकर्ते आहेत. 

भारती एअरटेलने पहिले स्थान कायम राखत सुमारे २९.९० टक्के हिस्सेदारी काबीज केली आहे. ऑक्‍टोबर महिन्यादरम्यान कंपनीची सेवा घेणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत ३१ लाखांची भर पडली आहे. त्यामुळे आता कंपनीच्या एकूण ग्राहक संख्येत वाढ झाली असून संख्या २८.५२ कोटींवर पोचली आहे. एअरटेल पाठोपाठ व्होडाफोन इंडिया लिमिटेडने बाजी मारली आहे. ऑक्‍टोबर अखेरपर्यंत कंपनीचे ग्राहक २०.८३ कोटी इतके झाले आहेत, तर आयडिया सेल्युलर लिमिटेडचे ग्राहक १९.०८ कोटींवर पोचले आहेत. 

या अहवालात वैयक्तिक सर्कलसाठी मोबाइल ग्राहकांची आकडेवारीही देण्यात आली आहे, यातील उत्तर प्रदेश (पूर्व) विभाग सर्वोच्च राहिले असून, यातील एकूण ग्राहक ८.३६ कोटी इतके आहे, यात महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर असून, याची एकूण मोबाइल ग्राहकांची संख्या ७.९४ कोटी इतकी  आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT