नवी दिल्ली : अल्पबचत योजनांवरील व्याजदरात केंद्र सरकारने 0.2 टक्के कपात केली असून, ही कपात जानेवरी ते मार्च या तिमाहीसाठी असेल. सरकारच्या या निर्णयामुळे ठेवींवरील व्याजदरात बॅंकांकडून कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय बचतपत्र, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकासपत्र आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी यांच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर 8.3 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. तसेच, बचत ठेवींवरील वार्षिक व्याजदर 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. सरकारने एप्रिलपासून अल्पबचत योजनांवरील व्याजदराचा तिमाही आढावा घेण्यास सुरवात केली आहे.
अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, भविष्य निर्वाह निधी आणि राष्ट्रीय बचत पत्रावर वार्षिक व्याजदर आता 7.6 टक्के असेल. किसान विकास पत्रावर 7.3 टक्के व्याजदर असणार आहे आणि त्याची मुदत अकरा महिन्यांत पूर्ण होणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेचा वार्षिक व्याजदर 8.3 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर 6.6 ते 8.4 टक्के दराने तिमाही व्याज मिळणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.