Share Market
Share Market Sakal
अर्थविश्व

शेअर बाजारातील अस्थिरते दरम्यान ऑटो सेक्टरचा 'हा' शेअर करेल कमाल

धनश्री ओतारी

शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून अतिशय चढ - उतार होताना दिसत आहेत. अशावेळी गुंतवणुकदार आहेत ते शेअर्स विकण्याच्या मार्गावर असतात. पण अशावेळी गुंतवणूक करणे तुमच्या भविष्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर आहे असे तज्ज्ञ कायम सांगत असतात. पण मग कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अशावेळ शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन तुम्हाला मदत करु शकतील, त्याच्या सल्ल्यानुसार तुम्ही शेअर्स खरेदी करू शकता.

बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी फिएम इंडस्ट्रीज लिमिटेडची (Fiem Industries Ltd) निवड केली आहे. या स्टॉकवर त्यांनी याआधीही 2 वेळा खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. शेअर बाजारात प्रचंड घसरण होत असतानाही या शेअरमध्ये चांगली वाढ दिसून येत आहे असे जैन म्हणाले.

फिएम इंडस्ट्रीज लिमिटेड (Fiem Industries Ltd)

सीएमपी (CMP) - 1040 रुपये

टारगेट (Target) - 1290 रुपये

कंपनीचे फंडामेंटल्स ?

कंपनीचे मूल्यांकन खूपच स्वस्त आहे आणि स्टॉक 14 च्या PE मल्टिपलवर ट्रेडिंग करत आहे. याशिवाय, कंपनीचा इक्विटीवर परतावा (Return on equity) 15-16 टक्के आहे. कंपनीवर केवळ 45 कोटी रुपयांचे कर्ज आहे. कंपनीमध्ये प्रोमोटर्सचा हिस्सा सुमारे 67 टक्के आहे आणि FII चीही त्यात चांगली भागीदारी आहे. चौथ्या तिमाहीत, कंपनीचे मार्जिन स्थिर राहिले आणि OPM सुमारे 15 टक्के राहिला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT