LIC IPO मध्ये गुंतवणूक करणार आहात ? मार्केट एक्स्पर्ट काय सांगत आहेत ऐका ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LIC IPO

LIC IPO मध्ये गुंतवणूक करणार आहात ? मार्केट एक्स्पर्ट काय सांगत आहेत ऐका !

एलआयसीचा आयपीओ खुला व्हायला आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. 4 मे 2022 ला आयपीओ खुला होईल तर 9 मे पर्यंत तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. या आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे. LIC चा ब्रँड खूप मजबूत असल्याने गुंतवणूकदारांना या IPO मध्ये बोली लावायची आहे. पण, ब्रँडसाठी केवळ मजबूत असणे पुरेसे नाही. जर तुम्ही एखाद्या कंपनीत गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला भविष्यात तिच्या व्यवसायाच्या कामगिरीबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. (The IPO is expected to be the biggest in the Indian capital markets given the size and scale of LIC.)

LIC ची स्थापना 1 सप्टेंबर 1956 रोजी झाली. यासाठी 245 खासगी जीवन विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि मग ते विलीन झाले. त्याचे सुरुवातीचे भांडवल अर्थात कॅपिटल 5 कोटी होते. स्थापनेपासून ते 2000 पर्यंत, ही देशातील एकमेव जीवन विमा कंपनी होती.

हेही वाचा: कोरोनामुळे झालेलं नुकसान भरुन काढायला लागणार 12 वर्षे; RBI चा अहवाल

एलआयसी 65 वर्षांपासून भारतातील लोकांना जीवन विमा प्रोडक्ट्स देत असल्यााचे मार्केट एक्स्पर्ट आनंद राठी म्हणाले. ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. प्रीमियमच्या (GWP) संदर्भात त्याचा बाजारातील हिस्सा 61.6 टक्के आहे. नवीन बिझनेस प्रीमियमच्या बाबतीत त्याचा शेअर बाजारातील हिस्सा 61.4 टक्के आहे. वैयक्तिक पॉलिसींच्या बाबतीत त्यांचा बाजारातील हिस्सा 71.8 टक्के आहे.

प्राइस बँडच्या वरच्या स्तरावर LIC च्या IPO ची व्हॅल्यू त्याच्या एम्बेडेड व्हॅल्यूच्या 1.11 पट आहे. त्याचे व्हॅल्युएशन 6 लाख कोटी रुपये आहे, जे खासगी जीवन विमा कंपन्यांपेक्षा कमी आहे. एलआयसीचा आयपीओ गुंतवणूकदारांना आकर्षक दिसत आहे. LIC ने आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO सादर केला आहे. त्याचे प्रॉडक्ट पोर्टफोलिओ डायव्हर्सिफायड आहे. आर्थिक ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. या सर्व कारणांमुळे, आनंद राठी या शेअरचे सबस्क्रिप्शन घेण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा: 'या' शेअरने एका वर्षात दिला 1000% परतावा, तुमच्याकडे आहे का ?

एलआयसीच्या आयपीओद्वारे सरकार 3.5 टक्के हिस्सेदारी विकून सुमारे 21,000 कोटी रुपये उभे करणार असल्याचे अरिहंत कॅपिटलने म्हटले आहे. GWP, NBP आणि वैयक्तिक पॉलिसींच्या विक्रीच्या बाबतीत LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. त्याचा बाजार हिस्सा 61.4 टक्के आहे, तर त्याच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्याचा बाजार हिस्सा 9.16 टक्के आहे. एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत असेही ते म्हणाले.

GWP च्या बाबतीत LIC जगात पाचव्या क्रमांकावर आहे. एकूण मालमत्तेच्या बाबतीत ते जगात 10 व्या क्रमांकावर आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत त्याची 2,048 ब्रांच ऑफिसेज आणि 1,559 सॅटेलाइट ऑफिसेज होती. देशातील 91 टक्के जिल्हे त्याच्या नेटवर्कमध्ये येतात. एलआयसीचे चांगले भविष्य लक्षात घेऊन गुंतवणूकदार या अंकात गुंतवणूक करू शकतात, असे अरिहंत कॅपिटलने म्हटले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Know About The Biggest Lic Ipo In The Indian Capital Market

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top