Dr George Thomas
Dr George Thomas Sakal
अर्थविश्व

वैद्यक सुधारणांसाठीचा आरोग्यदायी ‘अजेंडा’

सकाळ वृत्तसेवा

आपण वैद्यकीय सेवा विनामूल्य पद्धतीने देणाऱ्या; मात्र सार्वत्रिक करांतून भागवता येणाऱ्या यंत्रणेकडे वाटचाल सुरू केली पाहिजे. या दिशेने जाण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे म्हणजे आपण सगळ्या खासगी प्रॅक्टिशनर्सची एका प्रायमरी केअर नेटवर्कमध्ये नेमणूक करू शकतो-ज्यात प्रत्येक प्रॅक्टिशनरला काही ठराविक कुटुंबांच्या काळजीसाठी एक विशिष्ट रक्कम दिली जाईल.

पहिल्यांदा आपण ही गोष्ट मान्य केली पाहिजे, की विज्ञान हाच औषधांसाठी उत्तम पाया आहे. आपण खोटा राष्ट्रवाद सोडून दिला पाहिजे-जो पर्यायी वैद्यकाच्या नावाखाली होणाऱ्या अवैज्ञानिक उपचारांना धरून राहायला लावतो. त्याऐवजी पारंपरिक औषधांमधले जे काही उपयुक्त आहे ते आधुनिक वैद्यकशास्त्रातल्या यंत्रणेत आणले पाहिजे. असे झाले तरच त्याला स्रोतांचा योग्य वापर म्हणता येईल.

दुसरे म्हणजे, आपण आपल्या आरोग्यविषयक मनुष्यबळाचे नियोजन केले पाहिजे. या क्षेत्रात चपखल बसू शकणाऱ्या योग्य व्यक्तींना शिक्षणासाठी आपल्याला रास्त पर्याय शोधले पाहिजेत आणि त्यांच्या करिअरच्या वाटांचे योग्य नियोजन केले पाहिजे-ज्यामुळे आपले आरोग्य क्षेत्र ‘सुदृढ’ होईल आणि खासगी प्रॅक्टिसमध्ये रुग्णांसाठीच्या रोगट स्पर्धेतून ज्या काही विनाशकारी गोष्टी होतात त्या टळतील.

तिसरे म्हणजे आपण आरोग्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्कृष्ट गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत. त्याचबरोबर वैद्यकीय सेवा विनामूल्य पद्धतीने देणाऱ्या; मात्र सार्वत्रिक करांतून भागवता येणाऱ्या यंत्रणेकडे वाटचाल सुरू केली पाहिजे. या दिशेने जाण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे म्हणजे आपण सगळ्या खासगी प्रॅक्टिशनर्सची एका प्रायमरी केअर नेटवर्कमध्ये नेमणूक करू शकतो-ज्यात प्रत्येक प्रॅक्टिशनरला काही ठराविक कुटुंबांच्या काळजीसाठी एक विशिष्ट रक्कम दिली जाईल. यामुळे रुग्ण ताब्यात ठेवण्यासाठी होत असलेली स्पर्धा संपेल. याच स्पर्धेमुळे अनेक अतार्किक आणि चुकीचे उपचार केले जातात-ज्यांमध्ये अँटिबायोटिक्स आणि स्टेरॉईड्सचा अतिरेक केला जातो. ग्रामीण भागात योग्य शिक्षण न घेतलेले अनेक जण वैद्यकीय सेवा देताना दिसतात. त्यांनाही या प्रस्तावित यंत्रणेत सहभागी करून घेता येईल. त्यांच्यावर पात्र डॉक्टरांची देखभाल असेल आणि योग्य संधी मिळेल तेव्हा त्यांना बाजूला सारून त्या व्यक्तींच्या जागी हेच पात्र डॉक्टर सेवा देतील. यामुळे त्या व्यक्तींनाही एक चांगला आणि सुरक्षित ‘एक्झिट प्लॅन’ मिळेल. नर्स-प्रॅक्टिशनर्सनाही जिथे शक्य असेल आणि गरज असेल तिथे तैनात केले पाहिजे.

आपल्याला कोरोनासारख्या महासाथीसारखी आणखी कोणती वैद्यकीय आपत्ती टाळायची असेल, तर केवळ वरवरची दुरुस्ती करून भागायचे नाही ही गोष्ट आपण मुळात प्रामाणिकपणे मान्य केली पाहिजे. जे बदल खरेच आवश्यक आहेत ते समजून घेण्यासाठी आपल्याकडे दूरदृष्टी असली पाहिजे. या सुधारणा लागू करण्यासाठी लागणारे स्रोत शोधण्यासाठी आपल्याकडे धाडस आणि मनोबल या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. याआधीची सरकारे याबाबत अपयशी ठरली आहेत. त्यामुळे असे अपयशी न ठरणारे सरकार आपल्याला हवे आहे.

- डॉ. जॉर्ज थॉमस, अस्थिरोगतज्ज्ञ आणि ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल एथिक्स’चे माजी संपादक

(‘द इंडिया फोरम’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखावर आधारित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT