अर्थविश्व

मोदी-2 सरकारचा पहिला अर्थसंकल्प 5 जुलैला

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प 5 जुलैला सादर होणार आहे. नव्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 5 जुलैला लोकसभेमध्ये 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकार या अर्थसंकल्पात आपल्या पोतडीतून काय काढते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी चालू आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने 17 जून 2019 पासून लोकसभेच्या अधिवेशनाला परवानगी दिली आहे. 26 जुलै 2019ला हे अधिवेशन संपणार आहे. तर 20 जून 2019ला राज्यसभेच्या कामकाजाची सुरूवात होईल आणि 26 जुलै 2019ला राज्यसभेतील अधिवेशन संपणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 5 जुलै 2019 ला सकाळी 11 वाजता लोकसभेत सादर होणार आहे.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्या दिवसासाठी संसदेचे कामकाज तहकूब करण्यात येणार आहे. 19 जून 2019ला लोकसभेच्या नव्या सभापतीची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर 20 जून 2019ला संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधींसमोर भाषण करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT