अर्थविश्व

अर्थमंत्री जेटलींची उद्या बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली :केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उद्या (मंगळवार) सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत बॅंकांच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीत थकीत कर्जासोबतच बॅंकांच्या सद्य परिस्थितीबाबत आणि इतरही अनेक मुद्दयांवर चर्चा केली जाणार आहे. नुकताच बॅंक ऑफ बडोदा, विजया बॅंक आणि देना बॅंक या तीन सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या पार्श्वभूमीवरच या बैठकीकडे बघण्यात येते आहे. 

जेटली पतपुरवठा आणि बुडीत कर्ज, बॅंकांकडून कर्जवसुलीसाठी राबवण्यात येणारे प्रयत्न, सरकारकडून कायदेशीर पातळीवर कर्जांच्या वसुलीसाठी केले जात असलेले प्रयत्न या विषयांवरही चर्चा करणार असल्याचे समोर येते आहे. सध्या बॅंकांनी थकीत कर्जांच्या वसुलीसाठीचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. 

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बॅंकांनी 36,551 कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली केली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यात 49 टक्के वाढ झाली आहे. बँकिंग क्षेत्राचा अर्थव्यवस्थेवर होत असलेला परिणाम, वेगवेगळ्या क्षेत्रांसाठीचा पतपुरवठा, अटल पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री जन धन योजना यासारख्या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. सर्वच सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या थकीत कर्जाचे प्रमाण मोठे आहे. फक्त इंडियन बॅंक आणि विजया बॅंक या दोनच बॅंकांनी नफ्याची नोंद केली आहे. इंडियन बॅंकेला 1,258.9 कोटी रुपये तर विजया बॅंकेला 727.02 कोटी रुपयांचा नफा झाला होता. उर्वरित 19 सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना मोठ्या प्रमाणात तोटा झाला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या एकूण थकित कर्जाची रक्कम मार्चअखेर तब्बल 10 लाख 35 हजार 528 कोटी रुपयांवर पोचली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT