VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी आपल्या मुलीला मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने स्वीकारलं आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
VIDEO
VIDEO

लखनऊ- आई-वडील आपल्या मुलीला मोठ्या थाटामाटात लग्न करुन सासरी पाठवतात. पण, उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एका वडिलांनी त्यांच्या मुलीला मोठ्या थाटामाटात आणि बँड-बाजा लावून माहेरी घरी आणलं आहे. घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी आपल्या मुलीला मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने स्वीकारलं आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर वडिलांचे कौतुक होत आहे. मुलीचा घटस्फोट हा एक दुखाचा क्षण मानला जातो. पण, अनिल कुमार यांनी या घटनेला जल्लोषात बदललं आहे. अनिल कुमार हे बीएसएनएलमध्ये काम करतात. त्यांची ३६ वर्षीय मुलगी उर्वी हिचे लग्न २०१६ मध्ये एका कॉम्प्युटर इंजिनिअरसोबत झाले होते. उर्वी स्वत: नवी दिल्ली येथील पालाम एअरपोर्टमध्ये इंजिनिअर म्हणून काम करते. दोघांना एक मुलगी आहे, ते दिल्लीत राहत होते.

VIDEO
Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

पतीविरोधात आरोप

उर्वी हिच्या सासरचे तिचा हुंड्यासाठी छळ करत होते असा आरोप आहे. त्यानंतर उर्वीने घटस्फोटासाठी कोर्टाचे दार ठोठावले होते. कोर्टाने २८ फेब्रुवारीला जोडप्याला घटस्फोट मंजूर केला होता. उर्वी म्हणते की, तिने लग्न टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण, आठ वर्षे तिला छळ, मारहाण, शेरेबाजी सहन करावी लागली. त्यामुळे ती अधिक सहन करु शकली नाही.

VIDEO
Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

अनिक कुमार म्हणाले की, मी मुलीला घरी आणताना बँड-बाजाची व्यवस्था केली. कारण, मला वाटतं की याबाबत समाजात चांगला संदेश जायला हवा. लग्नानंतर मुलगी आपली राहत नाही असा जो समाजामध्ये समज आहे तो तोडण्याचा मी प्रयत्न केलाय. उर्वीची आई म्हणाली की, माझी मुलगी आणि नात यांच्यासोबत राहण्यासाठी मी उत्सुक आहे.

अनिक कुमार यांचे शेजारी म्हणाले की, 'आम्हाला सुरुवातीला वाटलं की उर्वी दुसऱ्यांदा लग्न करत आहे. पण, जेव्हा आम्हाला उर्वीच्या वडिलांचा हेतू कळाला तेव्हा आम्हाला खूप छान वाटलं.' उर्वीने आपला आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. काही काळ ब्रेक घेणार असून त्यानंतर नवीन सुरुवात करेन असं ती म्हणाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com