Gold 
अर्थविश्व

Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच, आताच तपासा आजचे भाव

वृत्तसंस्था

Gold-Silver Price update: नवी दिल्ली : या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत घट नोंदवली जात आहे. सोन्याने गेल्या वर्षीची सर्वात निच्चांकी पातळी गाठली आहे. गेल्या पाच दिवसांपासूनही सोन्याचे दर दररोज घसरत चालले आहेत. बुधवारी रात्री जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंची विक्री संपण्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सराफ बाजारात प्रति दहा ग्रॅम सोन्याचा भाव ४९ रुपयांनी घसरून ४३,९२५ रुपयांवर स्थिर झाला. याआधी सोन्याचे दर ४३,९७४ रुपये प्रति १० ग्रॅम होते. 

दुसरीकडे चांदीही ३३१ रुपयांनी घसरली असून प्रति किलो चांदीचा दर ६२,४४१ रुपये नोंदवला गेला आहे. अमेरिकेच्या आर्थिक सुधारणांच्या आशेमुळे डॉलरही वधारला आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी दिली. 

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, देशातील प्रमुख चार शहरांत प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत. दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ४३,२५० तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,१८० रुपये आहे. तसेच मुंबईत २२ कॅरेट सोने ४३,३७० रुपये आणि २४ कॅरेट सोने ४४,३७० रुपयांवर पोहोचले आहे. कोलकातामध्ये २२ कॅरेटचे सोने ४३,६८० रुपये, तर २४ कॅरेट सोने ४६,४०० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याची किंमत ४१,७४० आणि २४ कॅरेटची किंमत ४५,५४० रुपये आहे. 

तसेच दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या तिन्ही शहरांत चांदीचे दर ६३,२०० रुपये प्रतिकिलो आहेत. तर चेन्नईमध्ये चांदीचा दर ६७,३०० रुपये प्रतिकिलो अशी विक्री केली जात आहे. 

दरम्यान, बुधवारी व्यापाऱ्यांनी त्यांचे सौदे कमी केल्यामुळे सोन्याचे दर ०.१३ टक्क्यांनी घसरले आहेत. 

- अर्थविश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझा बॅचमेट इथं अधिकारी, बोगस IPS पोहोचला पुणे आयुक्तालयात; ज्याचं नाव घेतलं तो समोर येताच...

IND vs AUS 3rd T20I : अखेर, सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला! संजू सॅमसनसह तिघांना प्लेइंग इलेव्हनमधून केले बाहेर, बघा कोणाला मिळालीय संधी

Prakash Ambedkar : सरकारला शांत झोप लागावी म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात? प्रकाश आंबेडकर अजित पवार यांच्यावर संतापले

MPSC News : माऊलीच्या कष्टाचं सोनं! सफाई कामगार आई अन् बुट पॉलिश करणारा भाऊ; गरीबाची लेक MPSC तून बनली Class 1 अधिकारी, संघर्ष एकदा वाचाच

"वडिलांच्या मृत्यूंनंतर कोणता राजपुत्र नाचेल का ?" छावाच्या लेझीम सीनवर दिग्पाल यांची नाराजी

SCROLL FOR NEXT