gold silver price sakal
अर्थविश्व

Gold Rate: वीकेंडला सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आज सोन्याच्या दरात तेजी दिसतेय तर चांदीच्या दरात घसरण दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात तेजी-घसरण सुरू आहे. अशात वीकेंडला खरेदीचा जोर वाढतो त्यामुळे आज सोन्याच्या दरात तेजी दिसतेय तर चांदीच्या दरात घसरण दिसत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,810 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,160 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 617 रुपये आहे. (gold silver price update 12 November 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 52,160 रुपये

  • दिल्ली - 52,370 रुपये

  • हैदराबाद - 52,160 रुपये

  • कोलकत्ता - 52,160 रुपये

  • लखनऊ - 52,370 रुपये

  • मुंबई - 52,160 रुपये

  • नागपूर - 52,190 रुपये

  • पुणे - 52,190 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

Pune Crime : तळलेल्‍या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर; ‘एफडीए’ ची ५ ठिकाणी धाड, १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

Jalana Viral Video: दागिन्यावर डोळा, गावकऱ्यांनी भोंदूबाबाला दिला चांगलाच चोप, काय घडलं?

समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजच्या परिसरात छोट्या विमानाच्या गिरट्या; नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण...

Satana Suspicious Case : मध्यरात्रीच्या संशयास्पद विधीने खळबळ; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल, तपास वेगात

SCROLL FOR NEXT