Gold Rate: तुळशीच्या लग्नानंतर सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आज सोने चांदी च्या भावात तेजी दिसून येत आहे.
gold
goldsakal

आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. कधी सोने महाग तर कधी स्वस्त होत आहे. बुधवारी सोन्याच्या भावात घसरण दिसून आली होती तर चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. आज मात्र सोने चांदी च्या भावात तेजी दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,360 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,670 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 617 रुपये आहे. (gold silver price update 9 November 2022)

gold
Gold Rate: वीकेंडला सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 52,530 रुपये

  • दिल्ली - 51,770 रुपये

  • हैदराबाद - 51,670 रुपये

  • कोलकत्ता - 51,670 रुपये

  • लखनऊ - 51,670 रुपये

  • मुंबई - 51,670 रुपये

  • नागपूर - 51,690 रुपये

  • पुणे - 51,690 रुपये

gold
Gold Rate: खरेदीसाठी सुवर्णकाळ! सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या आजचे दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

gold
Gold Rate: वीकेंडला करा खरेदी! सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या आजचे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com