Gold Rate: खरेदीसाठी सुवर्णकाळ! सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या आजचे दर

आजही सोन्याच्या दरात घसरण कायम आहे तर चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.
Todays Gold Silver Update
Todays Gold Silver Update sakal

आठवड्याच्या सुरवातीपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. मंगळवारी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली होती तर आजही सोन्याच्या दरात घसरण कायम आहे तर चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,800 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,050 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 608 रुपये आहे. (gold silver price update 9 November 2022)

Todays Gold Silver Update
Gold Rate: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सोनं स्वस्त! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 52,900 रुपये

  • दिल्ली - 51,200 रुपये

  • हैदराबाद - 51,050 रुपये

  • कोलकत्ता - 51,050 रुपये

  • लखनऊ - 51,200 रुपये

  • मुंबई - 51,050 रुपये

  • नागपूर - 51,080 रुपये

  • पुणे - 51,080 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Todays Gold Silver Update
Gold Rate: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सोनं स्वस्त! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com