Bank
Bank 
अर्थविश्व

बँकींग क्षेत्रात आजपासून होणार 'हे' महत्त्वाचे बदल 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बँकांना बाह्य मानकावर आधारित व्याजदर बंधनकारक असेल. दिवाळीच्या खरेदीला चालना देण्याच्यादृष्टीने ऑक्‍टोबरपासून बाह्य मानकावर आधारित (एक्‍स्टर्नल बेंचमार्क) कर्जदर लागू करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने सर्व बॅंकांना दिले आहेत.

1 आक्‍टोबरपासून ही प्रणाली बँकांसाठी बंधनकारक केल्याने गृह, वाहन, वैयक्तिक तसेच उद्योजकांसाठीचा कर्जाचा दर अर्धा ते पाऊण टक्‍क्‍याने कमी होण्याचा अंदाज आहे.

पतधोरणातील व्याजदर कपातीचा ग्राहकांना लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांना रेपो दराशी सुसंगत व्याजदर निश्‍चित करावा लागेल. सध्या बँकांकडून "मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट"नुसार (एमसीएलआर) कर्जाचा दर ठरवला जातो, मात्र ही पद्धत रेपो दर कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहचवण्यात फायदेशीर ठरत नाही. यामुळे गृहकर्जदर प्रणाली पारदर्शक होण्याची शक्‍यता आहे. 

इंधनबिलावरील कॅशबॅक बंद 
तेल वितरक कंपन्यांच्या सूचनेनुसार बँकांकडून क्रेडीट कार्डद्वारे इंधन खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा कॅशबॅक आजपासून बंद होणार आहे. क्रेडीट कार्डद्वारे इंधनचा बिल अदा करणाऱ्या ग्राहकांना एक ऑक्‍टोबरपासून 0.75 टक्के कॅशबॅक मिळणार नाही, असे "एसबीआय"ने ग्राहकांना संदेश पाठवले आहेत. मात्र इतर डिजिटल पर्यायांद्वारे इंधन खरेदी करणाऱ्याच्या सवलती कायम राहतील, असे बॅंकेने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT