economy
economy 
अर्थविश्व

देशातील बेरोजगारी दर 23 टक्‍क्‍यांवर : सीएमआयई 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशभरात लॉकडाउननंतर बेरोजगारी दरात मोठी वाढ होत तो 23 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. शहरी भागातील बेरोजगारी दर सुमारे 31 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. लॉकडाउनचा विपरित परिणाम होत रोजगारात घट झाली आहे, अशी माहिती "सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी'ने (सीएमआयई) दिली आहे. मार्चच्या सुरवातीपासून बेरोजगारीत वाढ होण्यास सुरवात झाली आहे. त्यानंतर लॉकडाउनमुळे त्यात मोठी वाढ झाली आहे. 

सर्वसाधारण बेरोजगारी दरात 23.4 टक्‍क्‍यांची वाढ झाली असली तरी शहरी भागातील बेरोजगारीमध्ये अधिक वाढ झाली आहे. शहरी भागातील बेरोजगारीचा दर 30.9 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. मार्चच्या मध्यापर्यंत दर कमी होता; मात्र मार्चअखेर बेरोजगारीत मोठी वाढ झाली आहे, असे "सीएमआयई'ने म्हटले आहे. 

मार्च महिन्यातील बेरोजगारी दर हा गेल्या 43 महिन्यांमधील सर्वाधिक बेरोजगारी दर आहे. वर्ष 2016 मध्ये नोटाबंदीनंतर बेरोजगारी दरात मोठी वाढ झाली होती. फेब्रुवारीमध्ये तो 7.78 टक्के होता. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सध्या देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे; मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणखी वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT