अर्थविश्व

‘गुंतवणुकीसाठी दीर्घकाळाचा विचार महत्त्वाचा’

सकाळवृत्तसेवा

‘‘शेअर बाजारातील चढ-उतार हे कायमच चालू असतात. दीर्घकाळाचा विचार करता शेअर बाजार नेहमीच वाढत्या स्वरूपाचा राहिलेला आहे. त्यामुळे, गुंतवणूक करताना नेहमीच दीर्घकाळाचा विचार केल्यास त्याचा नक्की फायदा होईल,’’ असा सल्ला एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी प्रशांत जैन यांनी दिला. 

‘सकाळ मनी’ आणि एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने आयोजित गुंतवणूकदार जनजागृतीपर सेमिनारमध्ये श्री. जैन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची अंगभूत ताकद आणि भविष्यातील प्रगतीच्या संधींचे विवेचन केले. गणेश कला-क्रीडा मंच येथे झालेल्या या कार्यक्रमाला सर्व स्तरातील आणि वयोगटातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमाला पुण्यातील नामवंत गुंतवणूकतज्ज्ञ आणि बाजाराचे विश्‍लेषक कुंतल शहा, ‘सकाळ मनी’चे व्यवसायप्रमुख रोशन थापा हेही उपस्थित होते.

भारतीय अर्थव्यवस्था अतिशय मजबूत स्थितीत असून, प्रगतिपथावर आहे. ‘जीएसटी’ किंवा दिवाळखोरी कायद्यासारख्या आमूलाग्र बदलांमुळे तिला आणखी चालना मिळाली आहे. त्यामुळे रुपयाच्या किंवा शेअर बाजाराच्या तात्पुरत्या घसरणीने घाबरण्याचे कारण नाही. त्याऐवजी, शेअर बाजारातील घसरणीचा फायदा घेऊन दीर्घकालीन गुंतवणूक चालू ठेवली पाहिजे. तसेच, गुंतवणूक करताना महागाईदरावर मात करण्यासाठी इतर कोणत्याही गुंतवणूक प्रकारांपैकी ‘इक्विटी’ हाच ॲसेट क्‍लास उत्तम पर्याय असल्याचे अधोरेखित करताना त्यांनी गुंतवणुकीचे डायव्हर्सिफिकेशन करताना म्युच्युअल फंडाचे महत्त्व विशद केले.

‘एसआयपी’चा मार्ग उत्तम 
म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ हा गुंतवणुकीचा पर्याय भारतीय नागरिकांसाठी उत्तम असल्याचे सांगत श्री. जैन यांनी त्याला सोन्याच्या गुंतवणुकीचे उदाहरण दिले. ज्याप्रमाणे आपल्याकडे सोन्यात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करीत ती दीर्घकाळासाठी ठेवली जाते, त्याचप्रमाणे नजीकच्या काळातील शेअर बाजाराच्या पडझडीचा विचार न करता दीर्घकाळासाठी ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास येणारा परतावा उत्तमच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘सकाळ मनी’चे गुंतवणूक सल्लागार (एजंट) रवींद्र गुगळे, विवेक मोहिते, दीपक नाचन आणि अनिल कोळेकर यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्री. जैन यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या निवडक प्रश्‍नांना श्री. जैन आणि श्री. शहा यांनी उत्तरे दिली. ‘सकाळ मनी’चे संपादक मुकुंद लेले यांनी गुंतवणूक या विषयावर जनजागृती करण्यासाठी ‘सकाळ’ने वेळोवेळी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली, तर उपसंपादक गौरव मुठे यांनी ‘सकाळ मनी’च्या वेबसाइटविषयी आणि डिजिटल उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय तावडे यांनी केले. प्रवीण कुलकर्णी यांनी समन्वय सहाय्य केले.

कुंतल शहा यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना ‘इक्विटी’ या ॲसेट क्‍लासचे महत्त्व उलगडून सांगितले.

कोल्हापूरमधील सेमिनार
    वार व तारीख - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१८
    वेळ - सायंकाळी ५ वाजता 
    स्थळ - इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन, शाहू मिल रस्ता, ८ वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर
    प्रमुख वक्ते - अशोक कानावाला (उपाध्यक्ष - प्रॉडक्‍ट्‌स आणि बिझनेस डेव्हलपमेंट, एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी) 
    नावनोंदणीसाठी मिस्ड कॉल द्या - ७४४७४५२३३८

नाशिकमधील सेमिनार
    वार व तारीख - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१८
    वेळ - सायंकाळी ५ वाजता 
    स्थळ - हॉटेल दि एसएसके सॉलिटेअर, चांडक सर्कलच्या शेजारी, तिडके कॉलनी, नाशिक
    प्रमुख वक्ते - श्‍यामली बसू (वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य- प्रॉडक्‍ट्‌स आणि मार्केटिंग, एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी)
    नावनोंदणीसाठी मिस्ड कॉल द्या - ७४४७४५२३३२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT