BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

India Women Cricket team: भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेशला दुसऱ्या टी२०मध्येही पराभवाची धुळ चारली आहे.
India Women Team
India Women TeamSakal

India Women vs Bangladesh Women, T20I: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय महिला आणि बांगलादेश महिला संघात 5 सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे.

या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार 19 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिला संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर 120 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण भारताने 5.2 षटकात 1 बाद 47 धावा केलेल्या असताना अचानक पावसाला सुरुवात झाल्याने हा सामना थांबला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमाचा वापर करत भारताला 19 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.

India Women Team
India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

या सामन्यात बांगलादेश महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांना पहिलाच धक्का दुसऱ्या षटकात बसला. सलामीला खेळायला आलेली दिलारा अख्तर 10 धावांवर बाद झाली.

त्यानंतर मुर्शिदा खातुन आणि शोभना मोस्तरी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र शोभनाला श्रेयंका पाटीलने पायचीत करत 19 धावांवरच माघारी धाडले. त्यानंतर राधा यादवने 10व्या षटकात बांगलादेशला दुहेरी धक्के दिले.

कर्णधार निगर सुलकाना (6) आणि फाहिमा खातुन (0) या दोघींनाही तिने पायचीत केले. त्यानंतर लगेचच सुलताना खातुनलाही श्रेयंकाना माघारी धाडले. त्यामुळे एकवेळ बांगलादेशची अवस्था 69 धावांवर 5 विकेट्स अशी झाली होती. पण नंतर मुर्शिदाला रितू मोनीने साथ दिली आणि संघाला 100 धावा पार करून दिल्या.

मात्र अखेरच्या 5 षटकात अवघ्या 18 धावांत बांगलादेशने उर्वरित 5 विकेट्सही गमावल्या. रितूला दिप्ती शर्माने 20 धावांवर त्रिफळाचीत केलं, तर मुर्शिदा 46 धावांवर धावबाद झाली. त्यामुळे बांगलादेशला 20 षटकात सर्वबाद 119 धावाच करता आल्या.

India Women Team
T20 World Cup 2024: केएल राहुलला डच्चू, तर हार्दिक उपकर्णधार; वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात कसं आहे खेळाडूंचं संमिश्रण

भारताकडून गोलंदाजीत राधा यादवने 4 षटकात 19 धावा देत 3 विकेट्स घेतल्या, तर दिप्ती शर्माने 4 षटकात 14 धावांत 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय श्रेयंका पाटीलनेही 4 षटकात 24 धावांत 2 विकेट्स घेतल्या, तर पुजा वस्त्राकरनेही 1 विकेट घेतली.

त्यानंतर 120 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला होता. शफाली वर्मा शुन्यावरच बाद झाली होती. तिला मारुफा अख्तरने बाद केले होते.

पण एक बाजू स्मृती मानधनाने सांभाळली असताना दुसऱ्या बाजूने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या दयालन हेमलताने बांगलादेशच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. तिने अवघ्या 24 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारत बांगलादेशच्या पुढे राहिला.

आता या दोन संघात तिसरा सामना 2 मे रोजी होणार आहे. हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी भारतीय संघाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com