अर्थविश्व

मोदी पुन्हा येण्याआधीच अच्छे दिन; बाजारभांडवलात 5.33 लाख कोटींची भर!

वृत्तसंस्था

मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारभांडवलात तब्बल 5.33 लाख कोटी रुपयांची भर पडली. 

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1421.9 अंशांनी वधारून 39 हजार 352.67 अंशांवर बंद झाला. तर निफ्टी 11 हजार 828.25  अंशांवर व्यवहार करत स्थिरावला. त्यात 421.1 अंशांची वाढ झाली. सोमवारी मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारभांडवल 1 कोटी 51 लाख 86 हजार 312 कोटी रुपयांवर पोचले. शुक्रवारी बाजार बंद होताना हे बाजारभांडवल १ कोटी ४६ हजार 58 हजार 709 कोटी रुपये होते. गेल्या तीन सलग सत्रांमध्ये शेअर बाजारामध्ये वाढीचे सत्र कायम राहिले असून या कालावधीत मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण भांडवली मूल्य 7.48 लाख कोटी रुपयांनी वधारले आहे.

आज मुंबई शेअर बाजारात अदानी पोर्ट, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, इंडसइंड बँक,  एसबीआय आणि टाटा मोटर्स यांचे शेअर 10.99 ते 7.15 टक्क्यांदरम्यान वधारले होते. तर झी, बजाज ऑटो, टेक महिंद्रा आणि इन्फोसिसच्या शेअरमध्ये किरकोळ घसरण नोंदविण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT