अर्थविश्व

स्वत:चा व्यवसाय सुरू करायचाय? मग मुद्रा लोन आहे ना! (व्हिडिओ)

सकाळ डिजिटल टीम

पुणे: मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत उद्योजकता आणि व्यावसायिकता वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने मुद्रा लोन योजनेची सुरूवात केली आहे. मुद्रा लोन अतंर्गत अगदी छोट्यात छोट्या आणि कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिकाला कर्ज मिळते. मुद्रा लोन म्हणजेच मायक्रो-युनिट्स डेव्हलपमेंट अॅंड रिफायनान्स एजन्सी लि. (MUDRA).छोट्या किंवा लघु व्यवसायांना पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुद्रा लोन योजनेचे पूर्ण नाव प्रधानमंत्री मुद्रा योजना असे आहे. 

या योजनेचा लाभ घेऊ शकतो ?

कोणताही भारतीय नागरिक ज्याचा स्वतंत्रपणे किंवा भागीदारीत व्यवसाय आहे किंवा कोणताही भारतीय नागरिक जो अगदी छोट्या स्वरुपात व्यवसायाची सुरूवात करू इच्छितो, अशा सर्वांना हे कर्ज घेता येते. ग्रामीण आणि शहरी दोन्ही प्रकारच्या विभागांना ही योजना लागू होते. यात छोटासा कारखानदार, कारागीर, फळ विक्रेता, दुकानदार, ट्रकचालक, भाजीपाला विक्रेता, खानावळ इत्यादी प्रकारच्या कोणत्याही व्यवसायासाठी हे कर्ज मिळते.

मुद्रा योजनेचे प्रकार

शिशू योजना - यात नव्यानेच व्यवसाय सुरू करण्यासाठी 50,000 रुपयांपर्यत कर्ज मिळू शकते. कर्ज परतफेडीसाठी 5 वर्षांचा कालावधी असतो. व्याजदर- सर्वसाधारणपणे 11 ते 12 टक्के. मात्र प्रत्येक बॅंकेनुसार बदल असू शकतात.
किशोर योजना - यात व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसाय विस्तारासाठी 50 हजार रुपये ते 5 लाख रुपयांपर्यत कर्ज मिळू शकते. 12 ते 16 टक्के. मात्र प्रत्येक बॅंकेनुसार बदल असू शकतात.
तरुण योजना - यात व्यवसाय विस्तारासाठी 5 लाख रुपये ते 10 लाख रुपयांपर्यत कर्ज मिळू शकते. व्याजदर- सर्वसाधारणपणे 16 टक्के. मात्र प्रत्येक बॅंकेनुसार बदल असू शकतात.

कोणती कागदपत्रे लागतात ?
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ओळखपत्र लागते. त्याव्यतिरिक्त रहिवासाचा पुरावा (टेलिफोन बिल, विद्युत बिल, आधार कार्ड इत्यादी), जातीचा दाखला ही कागदपत्रे लागतात. जर आधीच व्यवसाय सुरू केलेला असेल तर व्यवसायाच्या नोंदणीचा दाखला, बॅलन्स शीट, मागील तीन वर्षांचे प्राप्तिकर विवरणपत्र आणि सेल्स टॅक्स विवरणपत्र लागतात. त्याशिवाय जर छोटासा कारखाना किंवा वर्कशॉप असेल तर त्यात असणाऱ्या मशिनरीची माहिती, पुरवठादाराची माहिती, मशिनरीची किंमत इत्यादी माहिती द्यावी लागते.

मुद्रा लोन कुठे मिळते ?

कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक, सहकारी बॅंक, महत्त्वाच्या खासगी बॅंका आणि मायक्रो फायनान्स वित्तसंस्था या सर्व ठिकाणी हे कर्ज उपलब्ध होऊ शकते.

मुद्रा लोनसाठी अर्ज कसा करावा ?

अर्जदाराने जवळच्या सार्वजनिक क्षेत्रातील, खासगी किंवा व्यावसायिक बॅंकेच्या शाखेत भेट देऊन अर्ज द्यावा. (काही खासगी किंवा व्यावसायिक बॅंका मुद्रा लोन देत नाहीत). तुमच्या व्यवसायाची कल्पना आणि विस्तुत माहिती अर्जासोबत द्यावी. वर उल्लेक केल्याप्रमाणे बॅंकेला आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करावी. कागदपत्रांची खातरजमा झाल्यानंतर बॅंक कर्जाला मंजूरी देते. अर्जदाराला कर्ज मंजूरीनंतर मुद्रा कार्ड देण्यात येते. या कार्डाचा उपयोग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डप्रमाणे करता येतो. मुद्रा कार्ड रुपे कार्डच्या सहयोगाने काम करते. या कार्डाचा वापर करून व्यवसायासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT