अर्थविश्व

सेन्सेक्सनंतर अब 'निफ्टी' की बारी; निफ्टीचा नवीन उच्चांक 

वृत्तसंस्था

भारतीय शेअर बाजारात गेल्या महिनाभरापासून (मार्च) संचारलेल्या उत्साहाने नवनवीन विक्रमांची नोंद व्हायला सुरुवात झाली आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीने या अगोदरचा 11,760 चा उच्चांक मोडून 11,761 ची पातळी गाठली आहे. तर, मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत 39,270 चा टप्पा गाठला आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात झाल्यापासूनच सकारात्मक व्यवहार होत आहेत. त्यामुळेच देशातील दोन्ही प्रमुख निर्देशांक 'ऑल टाईम हाय' वर व्यवहार करत आहेत. 

या अगोदर सेन्सेक्सने 1 एप्रिल रोजी ऑगस्ट 2018 मधील उच्चांक (38,989) मोडून नवीन उच्चांक 39 हजारांचा टप्पा ओलांडला होता. तर, बँक निर्देशांक 'बँक निफ्टी'ने देखील 30,646 वर पोचत नवीन उच्चांकाची नोंद केली आहे. 

प्रामुख्याने, परकी गुंतवणुकीचा वाढता ओघ, निवडणूकापूर्व सर्वेक्षणात चालू सरकारच्या बाजूने आलेले अंदाज, डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया, देशांतर्गत महागाई आटोक्यात असताना आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आरबीआयकडून व्याजदरात आणखी कपात करण्याची शक्यता आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या मध्यवर्ती बँकेने व्याजदर जैसे थे किंवा घसरते राहण्याचे दिलेले संकेत यामुळे सद्यस्थितीत भारतीय शेअर बाजार वरच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना दिसत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT