Nilesh Sathe writes Variety of general insurance
Nilesh Sathe writes Variety of general insurance  sakal
अर्थविश्व

साधारण विम्याचे वैविध्य

सकाळ वृत्तसेवा

साधारण विम्याच्या योजनांमध्ये जेवढी विविधता आहे, तेवढी आयुर्विम्याच्या योजनांमध्ये नाही. साधारण विम्याच्या योजना बेतणे खूपच आव्हानात्मक असतात, कारण बरीच गृहीतके ठरवावी लागतात. उदाहरणार्थ, अणुभट्टीच्या विमा करायचा असेल तर त्यासाठी किती प्रीमियम आकारावा, हे मागील अनुभवावरून ठरवताच येत नाही. प्रसिद्ध फुटबॉलपटू पेले याने आपल्या पायांचा विमा उतरविण्याचा प्रस्ताव दिला तर त्याला किती प्रीमियम आकारायचा, याचा पूर्वानुभव नसतांना विमा करायचा म्हणजे अंधारात तीर मारणे आहे.

अनेकांना माहीत नसेल, की नृत्यांगनेच्या पायांचा, तबलजींच्या बोटांचा आणि चित्रकाराच्या हाताचा सुद्धा विमा काढता येतो. आजारपणामुळे वा अपघातात जर या अवयवांना इजा पोचली तर विमा कंपनी ठरलेली रक्कम त्या कलाकारास देते. साधारण विम्याच्या करारात विमेदार विम्याचा हप्ता भरतो आणि विमा कंपनी ती घटना घडल्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई काही अटींवर करण्याचे मान्य करते.

एखादी व्यक्ती अपघात होऊन जखमी होईल, दुकानदाराचा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडेल किंवा सायबर हल्याने कंपनीची संगणक यंत्रणा ठप्प होईल, अशा कोणत्याही आकस्मिक घटनांना जोखीम म्हटले जाते. ही जोखीम पूर्णपणे टाळता येत नाही, पण तिची तीव्रता विम्याने कमी करता येते. साधारण विम्याचे ढोबळमानाने सात प्रकार आहेत. १) मोटार विमा, २) आगीचा विमा, ३) आरोग्य विमा, ४) सागरी विमा, ५) कर्मचाऱ्यांच्या दायित्वाचा विमा, ६) अभियांत्रिकी विमा आणि ७)संकीर्ण विमा.

मोटार विमा : हा लोकप्रिय प्रकार आहे. कारण प्रत्येक वाहनाचा विमा उतरविणे मोटार वाहन कायद्यानुसार अनिवार्य आहे. त्रयस्थ पक्षाच्या हानीस मोटारमालकाला जबाबदार धरण्यात येते आणि त्याला नुकसानभरपाई द्यावी लागते. ही जोखीम मोटारमालक विमा कंपनीवर टाकतो. त्याला मोटार विमा किंवा वाहन विमा म्हणतात. वैधानिक उत्तरारदायित्व स्वीकारणारी पॉलिसी प्रत्येक वाहन मालकास काढावी लागते; पण या व्यतिरिक्त सर्वंकष संरक्षण देणारी पॉलिसी, ज्यात अपघातामुळे वाहनाला झालेले नुकसानसुद्धा विमा कंपनी भरून देते, अशी पॉलिसी पण घेता येते.

विम्याचा हप्ता हा वाहनाच्या प्रकारावर अवलंबून असतो; जसे, दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, खासगी, व्यापारी वाहने आदी. पॉलिसीच्या वर्षात नुकसानीचा एकही दावा उद्भवला नाही तर पुढील वर्षी विमा हप्त्यात सवलत मिळते. ही सवलत विमेदाराशी संबंधित असते, विमित वाहनाशी नाही, हे लक्षात घ्यावे. म्हणजे जर आपल्या जुन्या वाहनावर ३५ टक्के नो क्लेम बोनस असेल आणि आपण नवे वाहन घेतले, तर नव्या वाहनाचा हप्ता देखील ३५ टक्क्यांनी कमी होतो, हे अनेकांना माहीत नसते.

आगीचा विमा ः ग्राहकांच्या गरजेनुसार विमा कंपन्या आगीच्या विम्यात अनेकविध जोखीम स्वीकारतात. उदाहरणार्थ, क्षतिग्रस्त इमारत पाडणे, ढिगारा उचलणे, पुनर्बांधणी, उत्पादन ठप्प झाल्याने होणारे नुकसान, उत्पादन प्रक्रिया सुरु करण्याचा खर्च असे अनेक संभाव्य खर्च विमा पॉलिसीत समाविष्ट करता येतात.

आरोग्य विमा ः कोविड-१९ च्या महासाथीनंतर आरोग्य विम्याचे महत्त्व सर्वसामान्यांना चांगले समजले आहे. मोतीबिंदू किंवा गुडघ्याचा सांधा बदलणे या सारखी शस्त्रक्रिया करण्याचा खर्च आरोग्य विमा घेतल्यानंतर काही काळानंतर (सहसा चार वर्षे नूतनीकरण झाले असेल तरच) मिळतो.

सागरी विमा ः विम्याची सुरुवातच मुळी सागरी विम्याने झाली. जहाजातून मालाची आयात-निर्यात करताना जहाज बुडणे, जहाजावरील मालाचे समुद्राच्या लाटांनी नुकसान होणे, सागरी चाच्यांनी जहाजावरील माल लुटणे, जहाजांची टक्कर होणे अशा अनेकविध जोखीमांचा या विम्यात समावेश होतो. गोदामातून माल निघाल्यापासून खरीददाराच्या गोदामात माल पोहोचेपर्यंत येणाऱ्या सर्व जोखीमांचा विमा होतो.

कर्मचाऱ्यांच्या दायित्वाचा विमा : कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाने होणारे व्यवसायाचे नुकसान या विम्यात अंतर्भूत केलेले असते.

अभियांत्रिकी विमा : कारखान्याच्या स्थापनेपासून उत्पादन सुरु होईपर्यंत उद्भवणारी सर्व जोखीम या विमा प्रकारात धरली जाते.

संकीर्ण विमा : वरील सहा प्रकारात न मोडणारा जोखीम स्वीकारणारा विमा प्रकार हा संकीर्ण या प्रकारात येतो.

‘आयआरडीए’ने एप्रिल २०२२ पासून एक अत्यंत नवा विमा प्रकार सुरु करण्यास मान्यता दिली आहे, तो म्हणजे श्युअरटी इन्श्युरन्स. ठेकेदारांना कंत्राटासाठी बँक गॅरंटी द्यावी लागत असे, त्याऐवजी आता अधिक लाभ असलेली ही विमा पॉलिसी त्यांना घेता येऊ शकेल.

- नीलेश साठे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT