अर्थविश्व

नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला 

सकाळ वृत्तसेवा

लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) आर्थिक घोटाळ्याप्रकरणी लंडनमध्ये अटकेत असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला वेस्टमिन्स्टर न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने बुधवारी (ता.6) नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे मोदीची पुन्हा एकदा न्यायालयात रवानगी करण्यात आली. 

जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी नीरव मोदी वेस्टमिन्स्टर न्यायालयात उपस्थित होता. जामीन मिळावा यासाठी मोदीने 20 लाख ते 40 लाख पाऊंड हमी रक्कम देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र न्यायालयाने जामिनाची विनंती फेटाळून लावली. मार्चपासून तुरुंगात असल्याने चिंता आणि नैराश्‍याने ग्रासले असल्याचा दावा नीरव मोदीच्या वकिलांनी न्यायालयात केला.

आपल्याला तुरुंगात धोका असल्याची माहिती मोदीच्या वकिलांनी दिली, मात्र वेस्टमिन्स्टर न्यायालयाच्या न्यायाधीश इमा अरबथनॉट यांनी मोदीला जामीन देण्यास नकार दिला. नीरव मोदीला वॅण्ड्‌सवर्थ तुरुंगात ठेवण्यात आले आहे. फेब्रुवारीपासून नीरवची भारताकडे प्रत्यार्पण करण्यासंदर्भात न्यायालयाकडून सुनावणी केली जाणार आहे. 11 ते 15 मेदरम्यान यासंदर्भात न्यायालयाकडून निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

web title : Nirav Modi's bail application rejected

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT