Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Rohit Sharma injured before T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 नंतर लगेच टी-20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे.
Rohit Sharma injured before T20 World Cup 2024
Rohit Sharma injured before T20 World Cup 2024sakal

Rohit Sharma injured before T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 नंतर लगेच टी-20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाचीही घोषणा करण्यात आली आहे. पण या सगळ्यामध्ये रोहित शर्माबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे भारतीय चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.

Rohit Sharma injured before T20 World Cup 2024
MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. आणि मुंबई 3 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामना खेळला होता. रोहित शर्मा या सामन्याचा एक भाग होता, पण तो मैदानात आला नाही. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवले. म्हणजे या सामन्यात त्याने फक्त फलंदाजी केली. पण मुंबई इंडियन्सने रोहितचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून का वापर केला होता, यामागचे मोठे कारण समोर आले आहे.

Rohit Sharma injured before T20 World Cup 2024
Who Was Hamida Banu : जो मला हरवेल त्याच्याशीच मी लग्न करेन...; कोण आहे हमीदा बानो जिच्यासाठी गुगलने बनवले Doodle

रोहित शर्मा आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. या सामन्यात त्याने 12 चेंडूत केवळ 11 धावा केल्या. त्यानंतर पियुष चावला सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत आला तेव्हा त्याने रोहित शर्माबद्दल एक मोठे अपडेट दिले. आणि त्याचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करण्यामागील कारण सांगितले.

पियुष चावलाने पत्रकार परिषदेत म्हणाला की, या सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या पाठीत थोडे दुखत होते, त्यामुळे व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्याला मैदानात उतरवले नाही.

Rohit Sharma injured before T20 World Cup 2024
IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

रोहित शर्मा काही काळापासून सतत क्रिकेट खेळत आहे. आणि त्याने विश्रांतीही घेतली नाही. त्याने यावर्षी टीम इंडियासाठी सर्व मालिका खेळल्या आहेत. अशा स्थितीत वर्ल्ड कपपूर्वी रोहित शर्मावरील कामाचा बोजा सांभाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, जो आगामी सामन्यांमध्येही दिसून येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com