Petrol-Diesel Todays Price Updates | Petrol Diesel Rates  sakal
अर्थविश्व

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरातील एक लीटरचा भाव

मुंबईत आज एक लिटर पेट्रोल 120.51 रुपये आणि एक लिटर डिझेल 104.77 रुपयांना विकलं जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Petrol-Diesel Todays Price Updates: तेल कंपन्यांनीआज पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर केले. आज पुन्हा तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज जाहीर झालेल्या दरांनुसार, राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये आणि डिझेलचा दर 96.67 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

IOCL च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह इतर महानगरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मुंबईत आज एक लिटर पेट्रोल 120.51 रुपये आणि एक लिटर डिझेल 104.77 रुपयांना विकलं जात आहे. याशिवाय कोलकात्यात पेट्रोलची किंमत 115.12 रुपये आणि डिझेलची किंमत 99.83 रुपये आहे. चेन्नईतही तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. येथे एक लिटर पेट्रोलचे दर 110.85 रुपयांवर स्थिर आहेत, तर डिझेलचे दर 100.94 रुपयांवर आहेत.

देशाच्या काही प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव -

दिल्ली - 105.41 रुपये प्रति लिटर

मुंबई -120.51 रुपये प्रति लिटर

चेन्नई - 110.85 रुपये प्रति लिटर

कोलकाता - 115.12 रुपये प्रति लिटर

नोएडामध्ये - १०५.४७ रुपये प्रति लिटर

लखनौमध्ये - 105.25 रुपये प्रति लिटर

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT