
बँक ऑफ बडोदाची गृहकर्ज, कार लोनवरील व्याजदरात कपात; पाहा नवे दर
तुम्ही घर किंवा कार खरेदीसाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा (BoB) ने गृहकर्ज (Home Loan) व्याज दर 6.50 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला असून सोबतच बॅंकेने ग्राहकांना दिलासा देत कार लोन वरील व्यजदरात देखील कपात केली आहे. दरम्यान व्याज दरातील ही कपात मर्यादित कालावधीसाठी करण्यात आली आहे.
बँक ऑफ बडोदाने 30 जून 2022 पर्यंत मर्यादित कालावधीसाठी 6.50% आणि 7% अनुक्रमे गृहकर्ज आणि कार लोन व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. बँक ऑफ बडोदाने आज कार लोनवरील व्याज दरांमध्ये पूर्वीच्या 7.25 टक्क्यांवरून 7 टक्के कपात केली आहे. ही व्याज दरातील सवलत 30 जून 2022 पर्यंत मर्यादित कालावधीसाठी असणार आहे. सुधारित दरांनुसार, BoB ने वार्षिक 6.75% वरून 6.50% पर्यंत गृहकर्ज कमी करण्याची घोषणा केली आहे.
नवीन कार खरेदीसाठी प्रोसेसिंग फीवर सवलत देण्यासोबतच प्रतिवर्षी 7 टक्के दराने सध्या कर्ज उपलब्ध आहे. एका निवेदनात, बँकेने म्हटले आहे की, 30 जून 2022 पर्यंत मर्यादित कालावधीसाठी प्रक्रिया शुल्क देखील कमी करून फ्लॅट 1,500 रूपये (अधिक GST) केले आहे.
हेही वाचा: नवाब मलिक तुरुंगात पडले, प्रकृती गंभीर; वकिलांची कोर्टात माहिती
बॅंक ऑफ बडोदाचे जनरल मॅनेजर एचटी सोलंकी कारलोन व्याजदरात कपात केल्यानंतर म्हणाले की, कोरोना माहामारी आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनचा ऑटो सेगमेंटवर परिणाम होत असताना, अर्थव्यवस्था खुली झाल्यामुळे आम्ही कार कर्जाच्या मागणीत सातत्याने वाढ पाहिली आहे आणि लोक कर्जमुक्त झाले आहेत. स्वतःच्या वाहनाने प्रवास करण्यास उत्सुक आहेत. बडोदा कार कर्जाच्या व्याजदरात घट आणि प्रक्रिया शुल्कात कपात केल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीची कार खरेदी करणे सोपे आणि अधिक परवडणारे होईल.
हेही वाचा: राज ठाकरे 'हिंदू जननायक' नाही, तर हिंदू मुस्लिम एकतेचे 'खलनायक'
Web Title: Bank Of Baroda Cuts Interest Rate On Home And Car Loans
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..