Public sector banks merger
Public sector banks merger 
अर्थविश्व

मोदी सरकारचा मोठा निर्णय: बँकांचे 'मेगा मर्जर'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषद घेत सार्वजनिक बँकांच्या एकत्रीकरणाची मोठी घोषणा केली. थकीत कर्जे आणि लिक्विडिटीच्या विळख्यातून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बाहेर काढण्यासाठी विविध बँकांना एकत्रित आणण्यात आले आहे. यानुसार  सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांचे आता 4 बँकांमध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे. म्हणजेच दहा बँकांना 4 बँकांच्या छताखाली आणण्यात आले आहे. बँकांच्या  एकत्रीकरणाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. 

निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेनुसार खालील प्रमाणे बँकांचे एकत्रीकरण होणार आहे. 

1) इंडियन बँक अलाहाबाद बँकेत विलीन होईल
2) पीएनबी बँकेत ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि युनायटेड बँक विलीन होणार  
3) युनियन बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक आणि कॉर्पोरेट बँका एकत्रित येणार 
4) कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक देखील आता एक बँक होणार 

त्याचबरोबर बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बँकांना पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यानुसार सार्वजनिक बँकांना 55,250 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. त्यानुसार बँकांना खालील प्रमाणे मदत मिळणार आहे. 

सेंट्रल बँक : 3300 कोटी 
बँक ऑफ बडोदा : 7000 कोटी 
युको बँक : 2100 कोटी 
युनायटेड बँक : 1600 कोटी 
कॅनरा बँक: 6500 कोटी 
इंडियन बँक : 2500 कोटी 
इंडियन ओव्हरसीज बँक : 3800 कोटी 
पंजाब अँड सिंध बँक : 750 कोटी
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atala Masjid: भिंतीवर त्रिशूळ, फुले? जौनपूरमधील अटाला मंदीर की मशीद? हिंदुंनी गाठलं कोर्ट, काय आहे संपूर्ण प्रकरण

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT