BRICS BRICS
अर्थविश्व

BRICS देशांमध्ये भारताचा आरोग्यावर सर्वात कमी खर्च

BRICS हा जगातील पाच प्रमुख देशांचा गट आहे. ज्यात ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका व्यतिरिक्त भारत आहे

प्रमोद सरवळे

औरंगाबाद: Public Spending on Healthcare: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातले आहे. मागील काही दिवसांपूर्वी देशात प्रतिदिन ४ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत होते. सध्या तो आकडा जरी कमी झाला असेल तरी परिस्थिती अजूनही बिकट असल्याचे चित्र आहे. देशातील कोरोना रुग्णांचा वाढता मृत्यूदर चिंतेचा विषय ठरत आहे. तर दुसरीकडे लसींच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणही बंद करण्यात आले आहे.

आरोग्य यंत्रणेवर सर्वात कमी खर्च?

यात अजून एक विचार करायला लावणारी बाब समोर आली आहे. भारतात आरोग्य यंत्रणेवर होणारा खर्च हा BRICS देशांत सर्वात कमी असल्याचे समोर आले आहे. हा दावा कोणत्या विरोधी पक्षाने केला नाही तर तो खुद्द भारत सरकारने मान्य केला आहे. पीटीआईच्या माहितीनुसार, गुरुवारी अर्थ मंत्रालय व न्यू डेवलपमेंट बँक (NDB) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्हर्चुअल सेमिनारमध्ये आर्थिक व्यवहार विभागाचे (DEA) सचिव अजय सेठ यांनी ही माहिती दिली. तसेच तंत्रज्ञान देशातील आरोग्य सुविधा सर्वसामान्यापर्यंत पोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते, असंही मत सेठ यांनी मांडलं.

BRICS

कोरोनामुळे शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठणे कठीण-

या सेमिनारमध्ये भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणारे अजय सेठ म्हणाले की, कोरोनामुळे शाश्वत विकासाचे (Sustainable development) उद्दीष्ट साधण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. संसाधने नेहमीच मर्यादित असतात, अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की आपले नेमके लक्ष्य काय आहे? अधिकाधिक लोकांना फायदा होण्याचा की गुणवत्तेवर लक्ष देण्याचा? वेगवेगळ्या देशांच्या परिस्थितीत बरेच फरक आहेत, मग ते सरासरी वयाचे असो किंवा सरकारी आरोग्य आणि शिक्षणावरील खर्च.

brics

भारताचा आरोग्यावर पाच देशांमध्ये सर्वात कमी खर्च-

शिक्षणाच्या बाबतीत, BRICSच्या तीन सदस्य देशांचा खर्च त्यांच्या जीडीपीच्या ४ ते ४.५ टक्क्यांच्या दरम्यान आहे, तर ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हे दोन देश त्यांच्या जीडीपीच्या जवळपास 6 टक्के खर्च करतात. तर आरोग्यावरील खर्चाचा विचार केला तर त्या बाबतीतही BRICS देशांमध्ये भारताचा सरकारी खर्च सर्वात कमी आहे. या परिस्थितीत, आरोग्य सुविधांच्या वितरण आणि वित्तपुरवठ्यात आपण काळजी घेतली पाहिजे.

तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर-

'तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने आरोग्य सेवा पुरविण्यास मदत होऊ शकते. टेलिमेडिसिन (Telemedicine) आणि डायग्नोस्टिक इंटरप्रिटेशन (diagnostic interpretation) यासारख्या क्षेत्रात तंत्रज्ञान मोठी भूमिका बजावू शकते. परंतु तंत्रज्ञानाचा वापर अशा प्रकारे केला पाहिजे जिथं गरीबांना प्रथम सुविधा मिळाल्या पाहिजेत', असेही अजय सेठ यांनी मत मांडले.

BRICS संघटना-

BRICS हा जगातील पाच प्रमुख देशांचा गट आहे. ज्यात ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका व्यतिरिक्त भारत आहे. जगातील सुमारे 42 टक्के लोकसंख्या या पाच देशांमध्ये आहे. एवढेच नव्हे तर जगातील जीडीपीच्या 23 टक्के, भौगोलिक क्षेत्राच्या 30 टक्के आणि व्यापारातील 18 टक्के हिस्सादेखील या पाच देशांचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pusad Gun Firing : पुसद मध्ये गोळीबार, चाकूहल्ल्यात दोघे जखमी; घटनेने खळबळ

FIFA सामन्यात दिसलेलं 'ग्रीन व्हिसल' नेमकं आहे तरी काय? Pain कमी करणाऱ्या या उपकरणाची जगभर होतेय चर्चा!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Khadakwasala Dam : धरण क्षेत्रात यंदा पावसाची मोठी तफावत; सरासरी ९५.८४ टक्के घट, पाणीसाठ्याबाबत चिंता

Land Acquisition : माऊलींच्या पालखीसाठी अवघ्या तीन महिन्यात भूसंपादन; इमारत पाडण्याचे काम सुरू

SCROLL FOR NEXT