अर्थविश्व

फ्लिपकार्टचे सचिन बन्सल यांनी  'ऍडव्हान्स टॅक्स'पोटी भरले 699 कोटी

वृत्तसंस्था

मुंबई: फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल यांनी प्राप्तिकर विभागाकडे 699 कोटी रुपयांचा 'ऍडव्हान्स टॅक्स'चा भरणा केला आहे. अमेरिकी कंपनी वॉलमार्टला नुकतीच फ्लिपकार्टची विक्री केल्यामुळे झालेल्या  भांडवली उत्पन्नाच्या नफ्यावर हा  'ऍडव्हान्स टॅक्स' भरला आहे. मात्र फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांना वॉलमार्टशी केलेल्या व्यवहारातून किती फायदा झाला ते सांगितलेले नाही. फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि माजी सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांना प्राप्तिकर विभागाने नोटिशीद्वारे किती नफा झाला याची विचारणा केली होती. वॉलमार्टने गेल्यावर्षी  9 मे 2018 रोजी फ्लिपकार्ट खरेदी केली होती.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाकडून वॉलमार्टलाही याबाबद्दल विचारणा करण्यात आली होती. परदेशी भागधारकांनी मिळवलेल्या नफ्यावरील कर भरला जात असल्याची खात्री करावी असे सांगण्यात आले होते. वॉलमार्टने गेल्या वर्षी 7,440 कोटी रुपयांचा कर भरला होता. फ्लिपकार्टची सिंगापूरमध्ये नोंदणी करण्यात आली होती. शिवाय सॉफ्टबँक आणि ईबे हे कंपनीचे मोठे भागधारक होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SCROLL FOR NEXT