अर्थविश्व

सौदी अरामको'कडून मेगा आयपीओची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

दहरान : जगातील सर्वांत मोठी खनिज तेल उत्पादक "सौदी अरामको'ने भांडवल उभारणीसाठी प्रारंभिक समभाग विक्रीची (आयपीओ) रविवारी (ता. 3) घोषणा केली आहे. रियाध स्टॉक एक्‍स्चेंज आणि जगातील प्रमुख भांडवली बाजारात अरामको शेअर्सची विक्री करून निधी उभारणार आहे. भांडवल उभारणीसाठीचा हा आयपीओ आतापर्यंतचा जगातील सर्वांत मोठा आयपीओ ठरण्याची शक्‍यता आहे.

सौदी अरामकोचे मूल्यांकन जवळपास 1.7 लाख कोटी डॉलर्स असून आयपीओ त्याहून अधिक असेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्‍त केला आहे. 2018 मध्ये सौदी अरामकोला 111.1 अब्ज डॉलरचा नफा मिळाला होता. ऍपल, गुगल आणि इक्‍झॉन मोबाईल या तीन कंपन्यांहून सौदी अरामकोचा नफा अधिक होता. 

वर्षभरापासून "सौदी अरामको'च्या "आयपीओ'ची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा लागली होती; मात्र कंपनीचे योग्य मूल्यांकन होत नसल्याने या प्रक्रियेला खीळ बसली होती. सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या धोरणानुसार सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था खनिज तेलाकडून शाश्‍वत पर्यायांकडे नेण्यासाठी सौदी अरामकोचा "आयपीओ' निर्णायक ठरणार आहे.
 

जगातील सर्वाधिक नफ्यात असलेली कंपनी म्हणून सौदी अरामकोची ओळख आहे. एकूण खनिज तेल उत्पादनाच्या 10 टक्के वाटा सौदी अरामकोचा आहे. दोन टप्प्यांमध्ये आयपीओ आणण्यात येणार असल्याचे सौदी अरामकोचे अध्यक्ष यासीर अल रुमय्यान यांनी सांगितले. सौदी अरेबियातील दोन भांडवली बाजारात सुरुवातीला 5 टक्के हिस्सा विक्री केला जाईल. दुसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय बाजारात शेअर्सची विक्री करून भांडवल उभारले जाईल, अशी माहिती रुमय्यान यांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT