Sensex ends 470 points down, Nifty below 10,700
Sensex ends 470 points down, Nifty below 10,700 
अर्थविश्व

शेअर बाजार घसरला; 'ही' आहेत कारणे

वृत्तसंस्था

मुंबई: जागतिक आणि देशांतर्गत पातळीवर घडत असलेल्या विविध नकारात्मक आर्थिक घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. शेअर बाजार आज (गुरुवार) घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 470 अंशांच्या घसरणीसह 36 हजार 093 अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 135.85 अंशाच्या घसरणीसह बंद झाला. निफ्टी अखेर 10 हजार 704 अंशांवर स्थिरावला. 

सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेस तब्बल 600 अंशांनी घसरून 36 हजारांच्या खाली घसरला होता. मात्र, दिवस अखेर त्यात सुधारणा   होऊन दिवसभराच्या नीचांकी पातळीपासून सेन्सेक्स आणि निफ्टी सावरले. दिवसभराच्या कामकाजानंतर बीएसईवरील स्मॉल, मिड आणि लार्जकॅपसहित एनएसई वरील सर्वच निर्देशांक नकारात्मक व्यवहार करत बंद झाले. 

शेअर बाजारात झालेल्या पडझडीची प्रमुख कारणे:

भारतीय फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) क्षेत्र मागील 15 वर्षातील सर्वात मोठ्या मंदीतून जात असल्याने महसुलात घट होऊ शकते. पैशांच्या  तरलतेचा अभाव आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली घट यामुळे ग्राहकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी सरकारच्या उत्पन्नात (जीएसटी) देखील घट होण्याची शक्यता आहे. एकूणच सध्याच्या निराशाजनक घडामोडींमुळे शेअर बाजारात 'सेलिंग'चा दबाव दिसून येत आहे. 

त्याचबरोबर, अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 25 बेसीस पॉइंट्सने कपात केली आहे. मात्र भविष्यात दर कपात होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केल्याने आणि बँक ऑफ जपानने देखील जागतिक मंदीची स्थिती आणखी वाढण्याची शक्यता वर्तविल्याने अमेरिका आणि आशियाई शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. 

परकी गुंतवणूक: गेल्या तीन दिवसात परकी गुंतवणूकदारांनी 1,850 कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत.    

रुपया घसरला: डॉलरच्या तुलनेत रुपया दिवसभराच्या उच्चाकीनंतर 23 पैशांनी घसरून 71.31 वर बंद झाला.

शेअर्स घसरले : येस बँक (16 टक्के), टाटा स्टील, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, मारुती

शेअर्स वधारले : टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, एशियन पेंट्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT