अर्थविश्व

सेन्सेक्समध्ये 700 अंशांची घसरण

वृत्तसंस्था

मुंबई: मोदी सरकार 2.0 ने नुकत्याच मांडलेल्या पहिल्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात आज घसरण झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 700 अंशांची घसरण झाली असून तो 38 हजार 815 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी 11 हजार 614.40 अंशांवर व्यवहार करतो आहे. त्यात 196.75 अंशाची घसरण झाली आहे. 

शेअर बाजारातील काही प्रमुख कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. निफ्टीमधील  50 पैकी 44 कंपन्यांच्या तर सेन्सेक्समधील 30 पैकी 25 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. दरम्यान पंजाब नॅशनल बँकेत भूषण पाव अँड स्टील या कंपनीचा पुन्हा नवीन एक गैरव्यवहारसमोर आल्यानंतर पीएनबीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. शेअरमध्ये 10.52 टक्क्यांची म्हणजेच 8.60 रुपयांची घसरण झाली असून तो 73.15 रुपयांवर व्यवहार करतो आहे. 

तसेच अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.  मात्र जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. सध्या मुंबई शेअर बाजारात येस बँक, एचसीएलटेक, टीसीएस, इन्फ्राटेल आणि यूपीएलच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे. तर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, ओएनजीसी, मारुती आणि आयओसीच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT