Share Market Updates esakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात सुरवातीला तेजी पण, बाजार अस्थिर राहण्याचे संकेत

आठवड्याच्या सुरवातीला शेअर बाजारात तेजी

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या सुरवातीला शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 0.32 टक्क्यांची वाढ दिसून आली तर निफ्टीमध्ये 0.16 टक्यांची वाढ दिसून आली आहे. आज सेन्सेक्स 97 अंकाच्या तेजीसह 58,963 वर सुरू झाला तर निफ्टी 45 अंकाच्या तेजीसह 17,582 वर सुरू झाला आहे. आज शेअर बाजारातील 26 शेअरमध्ये चांगली तेजी असून 24 शेअर घसरणीसह व्यवहार करत आहेत.

सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 0.54 टक्क्यांच्या तेजीसह 58,841.33 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 10 अंकांच्या तेजीसह 17,541.10 अंकांवर व्यवहार करत आहे. यामध्ये चढउतार सुरूच आहेत.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टी शुक्रवारी 17777 च्या महत्त्वाच्या लेव्हलवर टिकू शकला नाही, जे बाजाराचा एकूण कल कमकुवत असल्याचे सांगत  असल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे सिद्धार्थ खेमका म्हणाले. वोलेटिलिटी इंडेक्स इंडिया VIX ने देखील 7.8 टक्क्यांच्या वाढीसह 20 च्या लेव्हलजवळ पोहोचले आहे, जे बाजारातील वाढत्या अस्थिरतेचे लक्षण आहे. जोपर्यंत यूएस फेडचा व्याजदर वाढीबाबतचा दृष्टिकोन पूर्णपणे स्पष्ट होत नाही तोपर्यंत बाजारात हा कल कायम राहील अशी शक्यता आहे. याशिवाय, ECB आणि BOE देखील पुढील आठवड्यात त्यांचे आर्थिक धोरण जाहीर करतील, ज्यामुळे बाजारात अनिश्चितता असेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

टाटा कांझ्युमर्स (TATACONSUME)

टेक महिंद्रा (TECHM)

अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

इन्फोसिस (INFOSYS)

एमआरएफ (MRF)

ॲस्ट्रल (ASTRAL)

बाळकृष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

एल अँड टी (LTTS)

भारतफोर्ज (BHARATFORG)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT