कशी झाली शेअर बाजाराची सुरुवात....
कशी झाली शेअर बाजाराची सुरुवात.... Sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार सकारात्मक; सेन्सेक्स 201 तर निफ्टी 79 अंकांच्या वाढीसह सुरु

सकाळ डिजिटल टीम

Share Market Latest Updates: काल सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी बाजार घसरणीसह अर्थात लाल चिन्हात बंद झाला. आयटी, मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये विक्रीमुळे बाजारावर परिणाम झाला. आज मात्र शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक आज किरकोळ वाढीसह सुरु झाले. सेन्सेक्स 201.58 अंकांनी वधारून 53,950.84 वर सुरु झाला, तर निफ्टी 79.2 अंकांनी वधारून 16,105.00वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील हिंदाल्को, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, नेस्टले इंडिया, टाटा स्टीलसह 32 शेअर्स वाढीसह सुरु झाले, तर कोल इंडिया, इंडसलँड बँक, इन्फोसिस लिमिटेड, टिसीएस, अॅक्सिस बँकसह 18 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी शेअर बाजार घसरणीसह अर्थात लाल चिन्हात बंद झाला. आयटी, मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये विक्रीमुळे बाजारावर परिणाम झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 303.35 अंकांनी म्हणजेच 0.56 टक्क्यांनी घसरून 53,749.26 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 16,025.80 च्या पातळीवर 99.35 अंक म्हणजेच 0.62 टक्क्यांनी घसरला आहे.

युएस फेडने आर्थिक धोरणे कडक केल्यामुळे अमेरिकेत मंदीचे सावट निर्माण होऊ शकते, असा अंदाज जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी वर्तवला. सध्या जागतिक बाजारपेठेची नजर यूएस फेडवर आहे, ज्याचा उपयोग यूएसमध्ये आणखी व्याजदर वाढीचा अंदाज बांधण्यासाठी केला जाऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT