Share Market sakal
अर्थविश्व

Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

मंगळवारी बँकिंग व्यतिरिक्त इन्फ्रा आणि रियल्टी शेअर्समध्येही घसरण झाली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Tips : मंगळवारी सेन्सेक्स-निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक घसरले. बँकिंग शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बँकिंग इंडेक्स 1.5 टक्क्यांच्या आसपास घसरला आहे. बँकिंग व्यतिरिक्त इन्फ्रा आणि रियल्टी शेअर्समध्येही घसरण झाली.

मेटल आणि एफएमसीजी शेअर्सवरही दबाव दिसून आला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 632 अंकांनी घसरला आणि 60115 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 187 अंकांनी घसरून 17914 वर बंद झाला. निफ्टी बँक 568 अंकांनी घसरून 42015 वर बंद झाला.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

तर मिडकॅप 157 अंकांनी घसरून 31559 वर बंद झाला. निफ्टीच्या 50 पैकी 35 शेअर्समध्ये घसरण झाली. त्याचबरोबर सेन्सेक्समधील 30 पैकी 21 शेअर्सवर दबाव दिसून आला. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 11 शेअर्समध्ये घसरण झाली.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

लोकल गुंतवणूकदार जागतिक संकेतांवर लक्ष ठेवून असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. युरोपीय आणि अमेरिकन बाजारातील कमजोरीमुळे देशांतर्गत बाजारातही घसरण झाली. यामुळे निफ्टी 18000 च्या खाली बंद झाला.

कमकुवत जागतिक संकेतांमुळे गुंतवणूकदार सतत प्रॉफीट बुक करत आहेत. आता 18000 ची पातळी बुल्ससाठी खूप महत्वाची आहे. जर निफ्टीने वर जाऊन आणखी ताकद दाखवली तर यात 18100-18150 पर्यंत वाढ पाहू शकतो.

दुसरीकडे, निफ्टीला आता खाली 17800 वर सपोर्ट दिसत आहे. जर निफ्टी याच्या खाली गेला तर ही घसरण 17700-17675 पर्यंत जाऊ शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  1. अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  2. भारती एअरटेल (BHARTIARTL)

  3. आयशर मोटर्स (EICHERMOT)

  4. अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  5. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  6. भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  7. झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

  8. आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  9. इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  10. ए यू बँक (AUBANK)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT