shares
shares google
अर्थविश्व

एका वर्षात ज्वेलरी कंपनीचा शेअर 195% वाढला, आता देणार बोनस शेअर्स...

सकाळ डिजिटल टीम

दागिने बनवणारी दिग्गज कंपनी यु. एच झवेरीने (U.H.Zaveri) यावर्षी गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. या वर्षी आतापर्यंत त्यात 195.60 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि आता कंपनी शेअरधारकांना बोनस शेअर जारी करणार आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेटही निश्चित केली आहे. 1999 मध्ये या कंपनीची स्थापना झाली आहे आणि तेव्हापासून त्याचे ज्वेलरी स्टोअर अहमदाबाद, गुजरातमध्ये अतिशय प्रसिद्ध झाले आहे. कंपनीची मार्केट कॅप 22.60 कोटी रुपये आहे.

बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट 19 ऑक्टोबर 2022 निश्चित करण्यात आल्याची माहिती एक्सचेंज फायलिंगमध्ये दिली आहे. बोनस शेअर्स 2:3 च्या प्रमाणात जारी केले जातील. म्हणजेच भागधारकांना प्रत्येक दोन शेअर्सच्या मागे तीन शेअर्स मिळतील. याची फेस व्हॅल्यू 10 रुपये असेल.

यु. एच. झवेरीच्या (U.H.Zaveri) शेअर्समध्ये यावर्षी मोठी तेजी दिसत आहे. यावर्षी त्यात 195 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांची संपत्ती जवळपास तिप्पट झाली आहे. तर या शेअरने एका महिन्यात 53 टक्के आणि 6 महिन्यांत 130.94 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याची सध्याची किंमत 36.95 रुपये आहे, जी एका वर्षातील उच्चांक आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT