अर्थविश्व

देशातील कोट्यधीशांच्या संख्येत वाढ 

पीटीआय

नवी दिल्ली - देशातील कोट्यधीशांची संख्या आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये २३.५ टक्‍क्‍यांनी वाढून ५९ हजार ८३०वर पोचली. आधीच्या वर्षाच्या तुलनेत कोट्यधीशांची संख्या वाढली असली, तरी त्यांच्या एकूण उत्पन्नात मात्र, ५० हजार ८८९ कोटी रुपयांची घट  झाली आहे. 

प्राप्तिकर विभागाने विवरणपत्र छाननी वर्ष २०१५-१६ (आर्थिक वर्ष २०१४-१५) मधील आकडेवारी जाहीर केली. यानुसार, एक कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यांची संख्या ५९ हजार ८३० आहे. त्यांची एकूण संपत्ती १.५४ लाख कोटी रुपये आहे. छाननी वर्ष २०१४-१५ मध्ये एक कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांची संख्या ४८ हजार ४१७ होती. त्यांची एकूण संपत्ती २.०५ लाख कोटी रुपये होती. 

छाननी वर्ष २०१५-१६ मध्ये देशातील १.२ अब्ज नागरिकांपैकी ४.०७ कोटी करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्रे भरली. यातील ८२ लाख जणांनी शून्य अथवा अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न दाखविले. सध्या अडीच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर आकारला जात नाही. छाननी वर्ष २०१४ -१५ मध्ये ३.६५ कोटी नागरिकांनी प्राप्तिकर विवरणपत्रे भरली होती. त्यातील १.३७ कोटी नागरिकांनी शून्य अथवा अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न दाखविले होते.  छाननी वर्ष २०१५-१६ मध्ये सर्व करदात्यांचे एकूण उत्पन्न वाढून २१.२७ लाख कोटी रुपयांवर पोचले. त्याआधीच्या छाननी वर्षात ते १८.४१ लाख कोटी रुपये होते. सर्वाधिक १.३३ कोटी करदाते २.५ ते ३.५ लाख या उत्पन्नगटातील होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Constituency Lok Sabha Election Result: नणंद-भावजयीच्या हाय व्होल्टेज लढतीत सुप्रीया सुळेंची बाजी

Shirur Constituency Lok Sabha Election Result : पवारांचा मावळा आढळरावांवर भारी ! राजकीय उलथापालथीने अमोल कोल्हेंचा विजय सोपा

South Central Mumbai Lok Sabha Result: शेवाळेंची हॅट्रिक हुकली; अनिल देसाईंना मिळाली विजयी आघाडी!

Chandrapur Lok Sabha 2024 Election Results: सुधीर मुनगंटीवारांना धानोरकरांनी दिला धक्का! चंद्रपूर पुन्हा काँग्रेसकडे

India Lok Sabha Election Results Live : रायबरेलीतून राहुल गांधी विजयी! भाजपच्या 'या' बड्या नेत्याचा केला पराभव

SCROLL FOR NEXT