sbi 
अर्थविश्व

स्टेट बँकेच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत वाढ

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत स्टेट बँकेने (एसबीआय) ४५७४ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीपेक्षा हे प्रमाण ५१.८८ टक्क्यांनी जास्त आहे. एप्रिल ते जून २०२० च्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा ४१८९ कोटी रुपये होता.

दुसऱ्या तिमाहीत बँकेचा ऑपरेटिंग नफा (अपवादात्मक गोष्टी वगळता) ११.६६ टक्क्यांनी वाढून १६,४६० कोटी रुपयांवर गेला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत १४,७१४ कोटी रुपये होता. पहिल्या तिमाहीत ऑपरेटिंग नफा १६,५२१ कोटी रुपये नोंदविला गेला.जुलै ते सप्टेंबर या कालावधीत स्टेट बँकेचे एकूण व्याजउत्पन्न २८,१८१ कोटी रुपये होते, जे याच कालावधीतील गेल्या वर्षीच्या २४,६०० कोटी रुपयांच्या व्याजउत्पन्नापेक्षा १४.५६ टक्क्यांनी अधिक आहे. दुसऱ्या तिमाहीत कामगिरी चांगली असल्याचे बँकेने निवेदनात म्हटले आहे.

बँकेने नफा, भांडवली पर्याप्तता प्रमाण आदींमध्ये सुधारणा केली आहे. बँकेची एकूण थकीत कर्जे (एनपीए) पहिल्या तिमाहीत ५.२८ टक्के होती, तर गेल्यावर्षी याच तिमाहीत ७.१९ टक्के होती. या तिमाहीत निव्वळ थकीत कर्जे १.५९ टक्के होती, तर पहिल्या तिमाहीत १.८६ टक्के आणि गेल्यावर्षी दुसऱ्या तिमाहीत २.७९ टक्के होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक, पोलिसांनी केला पर्दाफाश

MHT CET Admission : ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस २७ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह मुदतवाढ

Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

SCROLL FOR NEXT