US election 2020: सारा मॅकब्राईड अमेरिकेतील पहिल्या ट्रान्सजेंडर सिनेटर

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 4 November 2020

सारा मॅकब्राईड यांनी मानवी हक्क अभियानासाठी राष्ट्रीय प्रेस सेक्रेटरी म्हणूनही काम केले होते.

वॉशिंग्टन- अमेरिकेतील ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या सारा मॅकब्राईड यांनी डेलावेर (Delaware) राज्याच्या सिनेटची निवडणूक जिंकली आहे. यामुळे मॅकब्राईड अमेरिकेच्या इतिहासात स्टेट सिनेटच्या जागेवर निवडून गेलेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती ठरल्या आहेत. सारा या डेमोक्रॅट पक्षाकडून या निवडणुकीत उतरल्या होत्या.

LGBTQच्या  हक्कांसाठी काम-
पिंक न्यूजनुसार, डेलावेरमधील LGBTQच्या  हक्क आणि भेदभावविरोधी उपाययोजनांच्या संरक्षणासाठीच्या लढाईत सारा मॅकब्राईडने (Transgender activist Sarah McBride) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच डेमोक्रॅट जो बिडेन (Joe Biden) यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यास 100 दिवसांच्या आत  LGBTQच्या संरक्षणासाठीचा कायदा मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे.

US Presidential Election Results Live:बहुमताच्या दिशेने बायडन, ट्रम्प यांना टाकले मागे

बराक ओबामा प्रशासनकाळात व्हाईट हाऊसमध्ये इंटर्नशिप-
सारा मॅकब्राईड यांनी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांच्या प्रशासनादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये इंटर्नशिप केली होती. सारा मॅकब्राईड यांनी 2016 च्या डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये एका मोठ्या पक्षाच्या अधिवेशनात बोलणारी पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती बनून इतिहास रचला होता. नंतर मॅकब्राईड यांनी मानवी हक्क अभियानासाठी राष्ट्रीय प्रेस सेक्रेटरी म्हणूनही काम केले होते.

फ्रान्सचा मालीमधील दहशतवाद्यांवर एअर स्ट्राईक; 50 जणांचा खात्मा

सारा मॅकब्राईडने जोसेफ मॅककोलचा पराभव केला आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणी कलानुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अटीतटीची लढत सुरू असल्याचे समोर आले आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US election 2020 Transgender activist Sarah McBride won Delaware