Tobacco and extra cigarettes were removed
Tobacco and extra cigarettes were removed 
अर्थविश्व

तंबाखू, सिगारेटवरील अतिरिक्त सीमाशुल्क काढले

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने तंबाखू उत्पादने, पान मसाला व सिगारेट यांच्यावरील अतिरिक्त सीमाशुल्क काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी झाल्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून लागू होणार आहे.

याबाबतच्या 27 फेब्रुवारी 2010 रोजी केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या अधिसूचना महसूल विभागाने रद्दबातल ठरविल्या आहेत. या अधिसूचना अनुत्पादित तंबाखू आणि इतर तंबाखू यांच्या सीमाशुल्काच्या दरासंदर्भातील होत्या. जीएसटीच्या घटनात्मक दुरुस्तीने केंद्र सरकार तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनांसह इतर सहा वस्तूंवर सीमाशुल्क आकारणार होते. यामध्ये कच्चे तेल, डिझेल, पेट्रोल व नैसर्गिक वायू आणि विमानासाठीचे इंधन (एटीएफ) आदींचा समावेश होता.

जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर या सर्व उत्पादनांना एकाचा करप्रणालीला जोडण्यात आले. याअंतर्गत पान मसाल्यावर 60 टक्के अधिभार, तर तंबाखूवर 71 ते 204 टक्के उपकर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचबरोबर सुगंधी तंबाखू, फिल्टर खैनी यांच्यावर160 टक्के अधिभार, तर गुटखा मिश्रित पान मसाल्यावर 204 टक्के लेव्ही आकारण्यात येणार होता.

65 मिमीपेक्षा अधिक आकार नसणाऱ्या फिल्टर तसेच नॉन फिल्टर सिगारेटवर 5 टक्के अधिभार व 1 हजार सिगारेटच्या मागे 1,591 रुपये अधिक घेण्यात येणार आहेत. 65 मिमीपेक्षा अधिक पण 70 मिमीपेक्षा अधिक आकार नसणाऱ्या नॉन फिल्टर सिगारेटवर 5 टक्के अधिभार व 1 हजार सिगारेटच्या मागे 2,876 रुपये अधिक घेण्यात येणार आहेत, तर फिल्टर सिगारेटवर 5 टक्के अधिभार व 1 हजार सिगारेटच्या मागे 2,126 रुपये अधिक आकारण्यात येणार आहेत. सिगारवर 21 टक्के उपकर किंवा 1 हजार सिगारेटच्या मागे 4, 170 रुपये यापेक्षा जे अधिक असेल ते आकारण्यात येईल. ब्रॅंडेड गुटख्यावर 72 टक्के अधिभार आकरण्यात आला असून, पाइपमधील धुम्रपानाचे मिश्रण व सिगारेट आदींवर तब्बल 290 टक्के उपकर आकरण्यात येणार आहे.

धुम्रपान आरोग्यास घातक आहे. (फेसबुकवर दाखवण्यात आलेले प्रातिनिधिक छायाचित्र आहे. त्यामुळे  छायाचित्रातील व्यक्ती आणि धुम्रपान याचा काहीही संबंध नाही. )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT