Trade war with US: China's GDP growth sinks to 6% in 3rd qtr
Trade war with US: China's GDP growth sinks to 6% in 3rd qtr 
अर्थविश्व

ट्रेड वॉर:चीनच्या अर्थव्यवस्थेला ग्रहण

वृत्तसंस्था

शांघाय: चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेने मागील तीन दशकांतील सर्वात नीचांकी  विकासदर नोंदवला आहे. चीनच्या देशांतर्गत बाजारपेठेतील घटती मागणी, अमेरिकेबरोबरच्या व्यापारयुद्धाची झळ यामुळे चीनची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत चीनचा विकासदर 6.0 टक्क्यांवर आला आहे. याआधीच्या तिमाहीत हाच विकासदर 6.2 टक्क्यांवर होता. 1992 नंतरचा हा सर्वात निचांकी विकासदर आहे. 

चालू आर्थिक वर्षासाठी चीनच्या सरकारने विकासदराचे उद्दिष्ट 6.0 ते 6.5 टक्क्यांदरम्यान ठेवले आहे. 2018 मध्ये चीनची अर्थव्यवस्था 6.6 टक्क्यांनी विस्तारली होती. मंदीतून सावरण्यासाठी चीनी सरकारने महत्त्वाच्या करांमध्ये कपात केली आहे. त्याचबरोबर चीनच्या शेअर बाजारातील परकी गुंतवणूकीवरील बंधने निकाली काढली आहेत. चीनच्या केंद्रीय बॅंकेने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 28 अब्ज डॉलर वित्तसंस्थांमध्ये ओतल्याची माहिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT