अर्थविश्व

मारुती सुझुकी 'ही' कार आणतेय इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये

वृत्तसंस्था

मुंबई: खासगी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली मारुती सुझुकी आता लोकप्रिय गाडी असलेली वॅगन आर आता इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बाजारात आणणार आहे. सरकारने पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी देखील थेट 5 टक्क्यांवर आणला आहे. आता वाहन निर्माता कंपन्यांकडून देखील 'ईव्ही' निर्मितीसाठी उत्साह दिसून येतोय. 

मारुती सुझुकीकडून लवकरच वॅगनआर ईव्ही सादर केली जाण्याची शक्यता आहे. देशभरात सध्या टेस्टिंग सुरु असून दहा लाखांच्या आसपास किंमत असण्याची शक्यता आहे. भारतात नुकतेच पदार्पण करणारी एमजी मोटर्स देखील ईव्ही वाहन भारतीय बाजारात आणणार आहे. टाटाने टिगॉरचे ईव्ही मॉडेल आधीच बाजारात आणली आहे. मात्र, भारतात अजूनही 'ईव्ही'साठी चार्जिंग स्टेशन उपलब्ध नाहीत. शिवाय सध्या बाजारात असलेल्या 'ईव्ही'च्या किंमती जास्त आहेत. ह्युंदाईने नुकतीच सादर केलेली 'कोना' या कारची किंमत देखील 25 लाख रुपये आहे. त्यामुळे अजूनही इलेक्ट्रिक वाहने सामान्यांच्या आवाक्या बाहेरच राहण्याची शक्यता आहे. यामुळे इलेक्ट्रीक कार परवडणाऱ्या किंमतीत नसल्याने ग्राहकांचा ओढा पेट्रोल, सीएनजी कारवर अधिक आहे. 

इलेक्ट्रीक वाहनांसाठी अडसर 
-चार्जिंग स्टेशनची कमतरता 
- चांगल्या दर्जाची बॅटरी उपलब्ध नाहीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT