अर्थविश्व

विजया, देना ‘बडोदा’त विलीन

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - विजया आणि देना बॅंकेची बॅंक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरणाची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली असून,  आजपासून (ता. १) बॅंक ऑफ बडोदा ही देशातील दुसरी मोठी बॅंक म्हणून अस्तित्वात येणार आहे. आठ दशके बॅंकिंग सेवेत स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या विजया आणि देना या दोन बॅंकांची ओळख काळाच्या पडद्याआड जाणार आहे; मात्र ग्राहकांमध्ये संभ्रम होऊ नये, यासाठी विजया आणि देना बॅंकेची नाममुद्रा आणखी काही काळ कायम राहणार असून, त्यावर बॅंक ऑफ बडोदाचा उल्लेख होईल.

केंद्र सरकारने सप्टेंबर २०१८ मध्ये तीन बॅंकांचे एकत्रीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सहा महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विलीनीकरणामुळे बॅंक ऑफ बडोदा ही एसबीआयनंतरची सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बॅंक बनली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या माहितीनुसार, उद्यापासून (ता. १) विजया आणि देना बॅंकेचे ग्राहक आणि ठेवीदार यापुढे बॅंक ऑफ बडोदाचे ग्राहक होतील. गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने बॅंक ऑफ बडोदाला ५ हजार ४२ कोटींची भांडवली मदत जाहीर केली होती. 

विजया बॅंकेविषयी
दिवंगत ए. बी. शेट्टींकडून १९३१ मध्ये स्थापना 
१९५८ मध्ये शेड्युल्ड बॅंकेचा दर्जा 
१९६३-६८ दरम्यान नऊ लघू बॅंकांचे अधिग्रहण
१५ एप्रिल १९८० रोजी बॅंकेवर सरकारची मालकी
देशभरात २ हजार ३१ शाखा, १३ विस्तारित कक्ष व २ हजार एटीएम

देना बॅंकेविषयी
देवकरन नानजी यांच्या कुटुंबीयांकडून १९३८ मध्ये स्थापना 
जुलै १९६९ मध्ये देना इतर १३ बॅंकांसह सार्वजनिक बॅंक बनली
इंग्रजी आद्याक्षर ‘डी’वर झळकणारी समृद्धीचे प्रतीक असलेली लक्ष्मीची प्रतिमा ही देना बॅंकेची नाममुद्रा 
देशभरात १ हजार ५१३ एटीएम व १ हजार ८७२ शाखा आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT