mi watch.
mi watch. 
अर्थविश्व

शाओमीची नवी स्मार्टवॉच

ऋषिराज तायडे

नवी दिल्ली : शाओमी दरवेळी नवनवीन उपकरणे बाजारात आणत असते. त्यांच्या उपकरणांविषयी नेहमीच उत्सुकता असते. नुकतेच शाओमीने Xiaomi Mi Watch सादर केलं आहे. या घड्याळाची किंमत जवळपास १३ हजार ५०० रुपये आहे. हे घड्याळ तुमच्या हातात छोटा फोन असल्याप्रमाणे असेल, असे सांगण्यात येते. ते हुबेहूब अॅपल वॉचप्रमाणेच दिसत असल्याने अनेकांनी ती थेट कॉपी असल्याचे मत व्यक्त केले. मात्र, शाओमीने हा आरोप फेटाळला असून, या वॉचची किंमत अॅपलच्या घड्याळापेक्षा निम्म्याहून कमी आहे! 

यामध्ये १.७८ ‘ AMOLED डिस्प्ले, Always On Screen, ४G eSIM सपोर्ट, कॉल्स करण्याची सोय, WiFi, Bluetooth अशा अनेक सोयी दिल्या आहेत. या घड्याळाला सिरॅमिक बॅक असून, फ्रेम अॅल्यूमिनिअमची आहे. अॅपलप्रमाणेच या मध्येही बटण आणि क्राऊन दिले आहे. या दोन्हीच्यामध्ये एक मायक्रोफोन आहे. घड्याळाच्या डावीकडे एक स्पीकर दिला असून यामधून कॉल्ससाठी आवाज, गाणी ऐकता येतील!
शाओमीच्या या घड्याळामध्ये Qualcomm Snapdragon ३१०० चिपसेट दिलेला असून तो क्वाडकोर प्रोसेसर आहे.

या घड्याळामध्ये अँड्रॉइडच्या वियरेबल्ससाठी असणाऱ्या WearOS आधारित MIUI For Watch जोडलेली आहे. याच्या मदतीने ४० हून अधिक अॅप्स दिलेले आहेत. MIUI चे Tasks, Recorder, Mi Home, Notes आदी लोकप्रिय अॅप यामध्ये देण्यात आले आहेत. शिवाय याच्या अॅप स्टोअरमधून आणखी अॅप्स वापरता येतील. या घड्याळाची बॅटरी लाईफ ३६ तासांची असल्याचा दावा शाओमीने केला आहे. ५७०mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

सोबत १GB रॅम आणि ८GB स्टोरेज दिले आहे. यामध्ये दहा शारीरिक क्रिया आपल्याला ट्रॅक करता येतील जसे की चालणे, पळणे, पोहणे, ट्रेकिंग इत्यादी. शिवाय हार्ट रेट मॉनिटरिंग दिलेले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सादर झालेले हे घड्याळ भारतात कधी उपलब्ध होणार याची घोषणा करण्यात आलेली नाही.

web title : Xiaomi's new smartwatch

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT