अर्थविश्व

येस बॅंकेच्या ठेवींमध्ये ३४ टक्‍क्‍यांची घट

वृत्तसंस्था

मुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या येस बॅंकेतील ठेवींमध्ये सप्टेंबर २०१९ नंतर मोठी घट झालेली आहे. बॅंकेतील ठेवींमध्ये सप्टेंबर २०१९ नंतर तब्बल ३४ टक्‍क्‍यांची घट झाली आहे. १.३७ लाख कोटी रुपयांवर असलेल्या बॅंकेतील ठेवी घटून ७१ हजार ९९१ कोटी रुपयांवर आल्या आहेत. 

बॅंकेवरील ग्राहकांच्या विश्वासासंदर्भात मोठाच प्रश्न निर्माण झाल्याचे हे लक्षण आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये येस बॅंकेतील ठेवींचे मूल्य २.०९ लाख कोटी रुपये इतके होते. सप्टेंबरनंतर त्यात घट होण्यास सुरूवात होऊन डिसेंबर २०१९ मध्ये ते १.६५ लाख कोटी रुपयांवर आल्या होत्या. येस बॅंकेच्या नेतृत्त्वाविषयी निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे ग्राहकांच्या विश्वासाला धक्का पोचून त्यांनी बचत खात्यातून आणि मुदतठेवींमधून पैसे काढून घेण्यास या कालावधीत सुरूवात केली होती. त्यानंतर त्यात आणखी घसरण होत ५ मार्च २०२० रोजी येस बॅंकेतील ठेवी १.३७ लाख कोटींवर आल्या आहेत. 

बॅंकेच्या दीर्घकालीन भवितव्याबद्दल आणि भांडवल उभारणीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली होती. त्याचाच परिणाम होत ठेवींमध्ये मोठी घसरण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT