Abhay Dewanji writes public awareness regarding plastic ban Solapur top pollution
Abhay Dewanji writes public awareness regarding plastic ban Solapur top pollution  sakal
Blog | ब्लॉग

Plastic Ban : प्लास्टिक बंदीबाबत आणखी किती जनजागृती करावी?

अभय दिवाणजी

सोलापूर शहरात सिंगल यूज प्लास्टिक बंदी करण्यात आली असतानाही, प्रशासनाने नुकत्याच टाकलेल्या छाप्यात पुन्हा प्लास्टिक मिळाले. १७० किलो प्लास्टिक जप्त करत एक लाख २८ हजारांचा दंड आकारला गेल्याची बातमी आली. वारंवार सूचना, आदेश देऊनही व्यापारी व ग्राहकांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जागृती का होत नाही, हेच कळेनासे झाले आहे. पर्यावरणाच्या पर्यायाने समाजाच्या दृष्टीने हानिकारक प्लास्टिक विरोधात कितीवेळा जनजागृती करावी, असा प्रश्‍न पडला आहे. आपल्या ऱ्हासाला आपणच कारणीभूत ठरत आहोत, हे निश्‍चित!

न्या. भुलेलाल कमिटीच्या अहवालानुसार, एकेकाळी प्रदूषणात आघाडीवर असलेल्या सोलापूरने हळूहळू कात टाकली. काही प्रमाणात लोकजागृती याला कारणीभूत ठरली. पर्यावरणप्रेमींनी उत्साहाने केलेल्या वृक्षलागवडीतून काही प्रमाणात सोलापुरातील धूळ व प्रदूषण कमी झाले. त्या काळात इंधनावर सेस भरून लीडयुक्त दर्जाचे इंधन जादा दराने खरेदी करावे लागत होते. आता प्रदूषणाबाबत काही प्रमाणात का होईना सुखद वातावरण आहे.

धुळीमुळे शहरातील वातावरण बिघडले होते. त्यावरही काही प्रमाणात मात करता आली. दुभाजकांच्या बाजूला पडलेल्या मातीतून धूळ उडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करून रोड स्वीपर वाहन खरेदी करण्यात आले. पूर्वीचे ते वाहन महापालिकेच्या (स्क्रॅप) भांडारात पडून आहे. नव्याने खरेदी केलेले रोड स्वीपर वाहन कधी कोणास दिसले माहिती नाही; त्याचा शोध घ्यावा लागणार आहे. यातून पूर्वी दररोज १२० कि.मी. अंतराची स्वच्छता करण्याचे ठरले होते. आता ४१ मार्गांवर कुठे एक दिवसाआड तर काही मुख्य रस्त्यांची स्वच्छता असे बदल करीत ११० कि.मी.ची स्वच्छता केली जात असल्याचे सांगण्यात येते.

महापालिका प्रशासनाने कचरा संकलनाबाबत खूप योजना आखल्या. मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यावर भर देण्यात येत असला तरी अजूनही म्हणावा तसा उपाय झाल्याचे निदर्शनास येत नाही. कचरा निर्मूलनासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या, परंतु त्याला मिळणारा प्रतिसाद तसा कमीच आहे. काही सोसायट्या, कुटुंबीय कचऱ्याचे विघटन आपापल्या सोसायटीत किंवा घराच्या परिसरात करत असल्याचे अनुकरणीय चित्र आहे. संपूर्ण आशिया खंडात एकमेव असलेला कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प फक्त सोलापुरात आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार सोलापूर महापालिका परिसरात १ जुलै २०२२ पासून सिंगल यूज प्लास्टिक बंदी केली.

आरोग्य निरीक्षकांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण विभाग, महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या साहाय्याने मुख्य बाजारपेठा, भाजी मार्केट, फ्लॉवर मार्केट, होलसेल विक्रेते व प्लास्टिक कारखान्यांची पाहणी करण्यात आली असता, बंदी असलेले प्लास्टिक जप्त करून दंड वसूल करण्यात आला.

सोलापुरातील अनेक कचराकुंड्या या सिंगल यूज प्लास्टिकनेच भरून वाहत असल्याचे चित्र आहे. काही खाद्य मिळते म्हणून जनावरे विशेषतः गायी कचराकुंड्यांतील खाद्य खातात. त्यांच्या पोटात शस्त्रक्रियेनंतर किलोंच्या वजनाने प्लास्टिक पिशव्या निघत असल्याचे विदारक वास्तव आहे. या विचित्र परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत.

जबाबदारी आपलीच..!

संपूर्ण जगभराबरोबरच सोलापुरातही सध्या प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वारंवार बजावून, नोटिसा देऊनही व्यापाऱ्यांमध्ये काही फरक पडत नसल्याचे दिसते. कारवाईचा बडगा थंडावला की पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ची स्थिती दिसते. याला काही प्रमाणात ग्राहक म्हणजे आपणही जबाबदार आहोत. खरेदीला जाताना सोबत कापडी पिशवी नेण्याचा कंटाळा याला कारणीभूत ठरत आहे. अजूनही गाड्यांवरची फळे, भाजी, हार-फुले सिंगल यूजच्या प्लास्टिक पिशवीतून घेण्याचा प्रघात आहे. व्यापारी अथवा ग्राहकांवर कारवाई करण्यापेक्षा प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसेच महापालिकेने या प्लास्टिक पिशव्यांच्या निर्मिती केंद्रावरच कारवाई केली तर मोठा परिणाम अपेक्षित आहे. तसे केल्यास मुळावरच घाव घातल्यासारखे होईल.

- प्लास्टिकचा वापर सक्तीने थांबवावा

- कापडी पिशवीचा वापर आवश्‍यक

- रोड स्वीपर वाहनाचा वापर गरजेचा

- प्लास्टिकविरोधी कारवाईत हवे सातत्य

- दुभाजकांच्या बाजूला पडलेल्या मातीमुळे धूळ

- स्वच्छतेसाठी प्रतिसाद कमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT