आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Election Commission News: यूपीच्या फर्रुखाबाद येथे एका तरुणाने आठवेळा मदतान केल्याचा दावा करण्यात आला होता.
re voting
re voting

लखनऊ: यूपीच्या फर्रुखाबाद येथे एका तरुणाने आठवेळा मतदान केल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. फर्रुखाबाद लोकसभा मतदारसंघातील अलीगंज विधानसभा मतदान केंद्र-३४२ येथे हा प्रकार घडला आहे.

एका व्यक्तीने आठवेळा मतदान केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी 'एक्स'वर पोस्ट करत याबाबत तक्रार केली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील हा मुद्दा उचलून धरला होता. वातावरण तापत असल्याचं पाहून निवडणूक आयोग सक्रिय झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेतले जाणार आहे.

re voting
Jalgaon Lok Sabha Constituency : लोकसभा निकालानंतर चाळीसगावातील राजकारणाला कलाटणी; आमदार मंगेश चव्हाण यांच्या वर्चस्वाचा फैसला

आरोपी तरुण हा १७ वर्षाचा असल्याची माहिती आहे. त्याला जिल्हा प्रोबेशन अधिकारी यांनी ताब्यात घेतले आहे. एकानंतर एक असे आठवेळा मतदान करतानाचा व्हिडिओ त्याने शेअर केला होता. शिवाय आपण कोणाच्या नावे मतदान करतोय हे देखील त्याने सांगितले होते. हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर होता. त्यामुळे निवडणूक आयोगाला तात्काळ दखल घ्यावी लागली.

आरोपी तरुण भाजप उमेदवाराला आठवेळा मतदान करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. अखिलेश यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी ही पोस्ट रिपोस्ट केली. सदर प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. निवडणूक आयोगाने तपास सुरु केला. हा प्रकार खिरिया पमारान पोलीस स्टेशन हद्दीतील असून जनपद एटामधील एका तरुणाचा हा कारनामा असल्याचं समोर आलं.

re voting
काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

फर्रुखाबादचे निवडणूक अधिकारी डॉ. वीके सिंह यांनी व्हायरल व्हिडिओचा तपास रिटर्निंग ऑफिसर १०३-अलीगंज यांच्याकडून करवून घेतला. त्यानंतर यात बुथ क्रमाक-३४३ प्राथमिक शाळा, खिरिया पमारान बुथवरील पोलिंग पार्टीचा निष्काळजीपणा समोर आला. त्यानंतर येथील सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. तसेच सहाय्यक रिटर्निंग अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com